घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांची भेट वैयक्तिक स्वरुपाची, सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांची भेट वैयक्तिक स्वरुपाची, सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

Subscribe

महाविकास आघाडी म्हणून आमच्या अशा भेटी होतातच आणि भविष्यातही अशा भेटी होतील

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती,असे सावंत यांनी भेटीनंतर सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे वाटप केले आहेत. त्यात अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्ता करण्यात आल्याने सचिन सावंत यांनी नाराज होऊन प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशीच सचिन सावंत यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळे तर्क लढवले जात आहेत. या संदर्भात सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्र्यांशी आपली भेटवैयक्तीक स्वरुपाची होती.महाविकास आघाडी म्हणून आमच्या अशा भेटी होतातच आणि भविष्यातही अशा भेटी होतील ,असे त्यांनी सांगितले.

देगलूरला प्रचाराला जाणार

दरम्यान ३० आँक्टोबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. या संदर्भात सचिन सावंत यांनी आज ट्विट केले. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपण येत्या २४ तारखेला देगलूरला प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -