घरताज्या घडामोडीCruise Drug bust : NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल

Cruise Drug bust : NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर पोहचली. आज गुरूवारी सकाळीच शाहरूख खानने आर्यन खानची आर्थर रोड कारागृह येथे दहा मिनिटे भेट घेतली. त्या घटनेला काही तास उलटताच तोच शाहरूख खानच्या घरी एनसीबीचे पथक पोहचले. जवळपास तीन चे चार अधिकाऱ्यांचे पथक मन्नतवर दाखल झाले आहे. दुसरीकडे बॉलिवुडच्या अभिनेत्रीच्या वांद्रे घरीही एनसीबीची टीम दाखल झाली आहे. अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावला आहे. अनन्या पांडेची दुपारी २ वाजता या ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार असल्याचे कळते. आज सकाळपासूनच एनसीबीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामध्ये अनन्या पांडेच्या अंधेरी येथील निवासस्थानी एनसीबीच्या टीमने छापा टाकला. आर्यन खान प्रकरणातच या दोन्ही छापेमारीचा संबंध असल्याचे कळते.

- Advertisement -

बॉलिवुड अभिनेत्री अनन्या पांडे ही आर्यन खानच्या संपर्कात असल्याचे एनसीबीच्या तपासात आढळल्याचे कळते. त्यामुळेच अनन्या पांडेच्या अंधेरीतील निवासस्थानी आज एनसीबीची एक टीम पोहचली. या टीमने अनन्याच्या घरी छापा टाकल्याचे वृत्त टी व्ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे. तसेच अनन्याला या प्रकरणात समन्स बजावतानाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. एनसीबीच्या पथकातील तीन ते चार अधिकारी हे अनन्या पांडेच्या घरी छापा टाकायला आज सकाळीच पोहचले. त्यानंतर अनन्या पांडेला समन्स बजावला असल्याचे कळते.

मन्नतवरही एनसीबीची टीम

शाहरूख खानचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मन्नत याठिकाणी एनसीबीकडून तपास होऊ शकतो असा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला होता. आर्यन खान प्रकरणातच ही छापेमारी झाल्याचे कळते. एनसीबीचे पथक दुपारी १२.३० च्या सुमारास मन्नत निवासस्थानी पोहचले. आर्यन खान प्रकरणातील तपासातच ही छापेमारी असल्याचे कळते. कागद पत्रांच्या पुर्ततेसाठी एनसीबीची टीम मन्नतवर दाखल झाल्याचे कळते. त्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास मन्नतमधून बाहेर निघाल्याचे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 20 दिवसांनंतर शाहरूख खान आर्यनला भेटला

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -