घरताज्या घडामोडीDA Hike : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची...

DA Hike : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

Subscribe

दिवाळीपुर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गुरुवारी पेंशनर्सना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महागाई भत्ता एकूण ३ टक्क्यांनी वाढवला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३१ टक्के होणार आहे. यंदा जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे १७ टक्क्यांवरुन २८ टक्क्यांवर महागाई भत्ता पोहचला होता. तसेच आता ३ टक्के वाढ केल्यामुळे महागाई भत्ता आता ३१ टक्के झाला आहे. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगाराच्या आधारावर ३१ टक्क्यांचा महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना केंद्राने मोठा दिलासा दिला आहे. यंदाची केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र केंद्र सरकारने गोड केली आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना कधी मिळणार ३ टक्केचा लाभ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फायदा हा १ जुलै २०२१ नंतर होणार आहे. बेसिक वेतन आणि पेंशनच्या रक्कमेवर टक्क्यांमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करुन महागाई भत्ता देण्यात येईल. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या ४७.१७ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८.६२ लाख पेंशनधारकांना लाभ मिळणार आहे. तसेच यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर फरक पडणार असून वर्षाला ९ हजार ४८८ करोड रुपयांचा भार येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : 100 crore COVID-19 vaccines: WHO ने केले भारताचे कौतुक, हे श्रेय…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -