घरताज्या घडामोडीमहागाईविरोधात काँग्रेस 'जेलभरो’ आंदोलन करणार, नाना पटोलेंची माहिती

महागाईविरोधात काँग्रेस ‘जेलभरो’ आंदोलन करणार, नाना पटोलेंची माहिती

Subscribe

सततच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसने दिवाळी नंतर म्हणजे १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरात महागाई विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. या आंदोलनाच्या दरम्यान जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे.

टिळक भवन येथे आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशातील भाजपच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप आणि चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे आणि सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी जिल्ह्या जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

एनसीबीच्या कारवायांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. जे चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानीछटा मुंद्रा बंदरावर तीन हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी आणि अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहेत,असा आरोपही पटोले यांनी केला.

- Advertisement -

मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली. त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हीन प्रयत्न भाजपकडून होत असल्याची टीकाही पटोले यांनी केली.


हेही वाचा : देश ड्रग्जमुक्त करण्याची किंमत तुरुंगवास असल्यास स्वागतच, वानखेडेंचं मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -