घरक्रीडाRahul dravid : राहुल द्रविडने पाठवले पत्र ; कोच पदापासून एक पाऊल...

Rahul dravid : राहुल द्रविडने पाठवले पत्र ; कोच पदापासून एक पाऊल दूर

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि वर्तमान नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा अध्यक्ष राहुल द्रविड भारतीय संघाचा हेड कोच बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा अध्यक्ष राहुल द्रविड भारतीय संघाचा हेड कोच बनण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्याने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाच्या पदासाठी पत्राद्वारे अर्ज केला आहे. अर्ज करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. बीसीसीआयच्या माहितीनुसार तो टी २० विश्वचषक २०२१ नंतर सध्याचे मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या जागी असणार आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरूण आणि फिल्डिंगचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी २० विश्वचषकानंतर संपणार आहे. भारतीय संघाचे ट्रेनर निक वेब हे देखील टी२० विश्वकपानंतर कार्यमुक्त होणार आहेत. BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की, “राहुल द्रविडने औपचारिकरित्या पत्राद्वारे अर्ज केला आहे, मंगळवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती एनसीए कडून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि फिल्डिंग कोच अभय शर्मा यांनी यासाठी अगोदरच अर्ज केला होता. त्यांचा अर्ज ही केवळ औपचारिकता होती.

- Advertisement -

दुबईत BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी राहुल सोबत बैठक घेतली, यूएईतील विश्वचषकानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसारच सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. तर पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

द्रविड सध्या बंगळुरूत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्थेचा अध्यक्ष आहे. राहुल द्रविड लवकरच भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार असून तो लवकरच एनसीएच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती या आधीच BCCI च्या एका अधिकाऱ्याने दिली होती.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -