घरमहाराष्ट्रजलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे 'दात घशात गेले', आशिष शेलारांची टीका

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे ‘दात घशात गेले’, आशिष शेलारांची टीका

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने चौकशी समित्या स्थापन केली होती. अशातच जलसंधारण विभागाने नुकताच एक अहवाल सादर करत जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट दिली आहे.

त्यामुळे फडणवीसांविरोधात आरोप केल्याने भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आता टीकेची झोड उठवली आहे. “जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही..”

“मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली ?. जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती. असंही आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

“मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना?” असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.


Tadap Teaser: ‘बेटा बापसे भी आगे जाऐगा’, सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’मधील एन्ट्रीवर चाहत्यांच्या कमेंट्स

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -