घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगावठी कट्टा विक्रीचे उत्तरप्रदेश कनेक्शन; नाशकात एकाला काडतुसांसह अटक

गावठी कट्टा विक्रीचे उत्तरप्रदेश कनेक्शन; नाशकात एकाला काडतुसांसह अटक

Subscribe

उत्तरप्रेदशमधील आरोपीकडून नाशिक शहरात विक्रीसाठी आणलेला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह एकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजपाल पन्नालाल शर्मा (वय ४५, रा. मोरवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबडमधील पंडीतनगर, मोरवाडी येथील मच्छी मार्केटजवळ तेजपाल शर्मा विनापरवानगी देशी बनावटीचा कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मच्छी मार्केटमध्ये सापळा रचला. पोलिसांनी शर्मा यास अटक केली. पोलीस चौकशीत त्याने उत्तरप्रेदशातील निरज भगेल कडून देशी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -