घरलाईफस्टाईलWorld AIDS Day : तुमच्याही मनात HIV/AIDS बाबत निर्माण होतायत असे प्रश्न?

World AIDS Day : तुमच्याही मनात HIV/AIDS बाबत निर्माण होतायत असे प्रश्न?

Subscribe

HIV चा संसर्ग ही जागतिक आरोग्य समस्या बनतेय. HIV ची लागण AIDS चं सगळ्यात मोठं कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आज जगभरात ३ कोटीहून अधिक लोकांना एड्समुळे आपला जीव गमवावा लागतोय. यात आफ्रिका खंडात एचआयव्ही एड्सचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे जगभरात वर्षाला १० लाखांच्या आसपास लोकांचा एचआयव्हीशी निगडीत रोगांमुळे मृत्यू होत आहे. यामुळे HIV/AIDS बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. मात्र या आजाराबद्दल आजही नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहे. अशाच १० प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ.

१) एड्स म्हणजे काय?

AIDS(Acquired Immune Deficiency Syndrome) एड्स म्हणजे एचआयव्ही या घातक जिवाणूंचा संसर्ग होणे. एचआयव्ही बाधित असणारा रुग्ण शेवटच्या स्टेटमध्ये असल्यास त्याच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. एड्स हा एक गंभीर आजार आहे.

- Advertisement -

२) एड्स होण्याची कारण काय?

एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध, तोंडावाटे, डोळ्यांवाटे अथवा रक्तातून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला एड्स होण्याची शक्यता असते.

३) एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून एड्सचे संक्रमण होते कसे?

असुरक्षित शरीरसंबंध, एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीस दिल्यास, डॉक्टरांकडून एड्स संक्रमित व्यक्तीची सुई वापरल्यास किंवा टॅटू शॉपमध्ये एड्स इन्फेक्टेड व्यक्तीला टॅटू काढण्यासाठी वापरलेली सुई दुसऱ्या व्यक्तीस वापरल्यास त्यातूनही हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ओरल सेक्समुळे आणि एचआयव्ही बाधित आईमुळे बाळाला एड्स होऊ शकतो.

- Advertisement -

४) महिला आणि पुरुषांमध्ये एचआयव्हीची लक्षण वेगवेगळी असतात का?

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये एचआयव्हीची लक्षणं थोडी वेगळी असतात. महिलांमध्ये दिसणारी प्रमुख लक्षणं म्हणजे शरीरावर लाल चट्टे येणे, पाळी थांबते, ताप, खूप थकवा येणे, भूक मंदावणे.

५) एचआयव्ही बाधित व्यक्तीमुळे त्याचा मुलांनाही त्याची लागण होऊ शकते?

एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेकडून गर्भावस्थादरम्यान तिच्या मुलाला संक्रमण होण्याची शक्यता असते. मात्र विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने लहान मुलांमध्ये संक्रमण रोखता येते. यात Tenofovir, Lamivudine आणि Efavirenz ट्रीटमेंटचा समावेश आहे.

६) कंडोम एचआयव्ही, एड्सपासून वाचण्यासाठी सुरक्षित माध्यम आहे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आज जगभरातील सर्वाधिक लोकांना या आजाराची लक्षणचं ठाऊक नाहीत. यामुळे जगभरात याचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढतायत. मात्र कंडोममुळे एचआयव्हीपासून थोडफार संरक्षण होते. मात्र कंडोममुळे एड्सपासून पूर्ण सुरक्षित राहू शकते असं म्हणता येणार नाही.

७) HIV वर कोणते उपचार आहेत का?

एड्सवर आजूनही कोणती उपचार पद्धती नाही किंवा कोणताही वॅक्सिन अद्याप विकसित झालेले नाही. त्यामुळे सुरक्षित शरीर संबंध हाच त्यामागचा एक सुरक्षित उपाय आहे. तसेच विषाणूबाधित कोणत्याही रुग्णाच्या सुईचा उपयोग करु नये. याशिवाय इतर अनेक गोष्टींबाबत माहिती घेत तुम्ही या विषाणूपासून वाचू शकता.

८) एड्स आजारावरील औषधांसोबत इतर औषधे खाऊ शकतो का?

काही औषधांच्या कॉम्बिनेशनमुळे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एड्सव्यतिरिक्त इतर आजाराने पीडित असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं इतर औषधांचे सेवन करा.

९) एड्सबाधित रोग्याने किती दिवसानंतर त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे?

इन्फेक्शनच्या आधारावर तपासणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त इन्फेक्टेड आहात, तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरात लवकर तपासणी करणे आवश्यक आहे. सामान्यतः भारतामध्ये एचआयव्हीसाठी जी चाचणी केली जाते त्यातून रुग्ण १० ते ९० दिवसांनी संक्रमित झाला होता की नाही हे समजते.

१०) जागतिक एड्स दिवस साजरा करण्यामागचे मुख्य उद्देश काय?

दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात १ डिसेंबर १९८८ रोजी झाली होती. मात्र जागतिक एड्स दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे एड्सग्रस्त लोकांची मदत करणे, त्यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा करणे, एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करणे आणि या आजाराबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे हा आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -