घरट्रेंडिंगDesi Jugad: केस सुकवण्यासाठी देसी जुगाड! प्रेशर कुकर बनला हेअर ड्रायर

Desi Jugad: केस सुकवण्यासाठी देसी जुगाड! प्रेशर कुकर बनला हेअर ड्रायर

Subscribe

मुलाचा देसी जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय

हल्लीचे तरुण लोक निरनिराळ्या हेअर स्टाइल करत असतात. आपल्या शरिराची देखील जितकी काळजी घेणार नाहीत तितकी काळजी केसांची घेतली जाते. केसांसाठी महागडे शॅम्पू,हेअर ऑईल्स लागली जातात. हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. केस ओले राहिले तर सर्दी तापाची शक्यता असते. केस सुकवण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे हेअर ड्रायर. आता सगळ्यांकडे हेअर ड्रायरल असेलच असं नाही ज्यांच्याकडे हेअर ड्रायर नाहीये त्यांनी काय करायचं? त्यासाठी हा देसी जुगाड पहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by black_lover__ox (@black_lover__ox)

- Advertisement -

सोशल मीडियावर  केस सुकवण्यासाठी स्वस्तात मस्त  देसी जुगाड करणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पठ्ठ्याने चक्क देसी जुगाड करत प्रेशर कुकर हेअर ड्रायर म्हणून वापरला आहे. ज्यांच्याकडे हेअर ड्रायर नाहीये त्यांना मात्र हा देसी जुगाड फारच आवडलेला दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर देसी जुगाड हेअर ड्रायरल व्हायरल झाला आहे. मुलाने प्रेशर कुकरची शिटी काढून त्यातून येणारी गरम वाफ केसांवर घेऊन हा मुलगा केस सेट करताना दिसतोय. मुलाचा जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय. हा व्हिडिओ व्हायरल होऊन आतापर्यंत या व्हिडिओला ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हेअर ड्रायरचा देसी जुगाड पाहून अनेक जण चकीत झाले. अनेकांनी मुलाची खिल्ली देखील उडवली आहे.

- Advertisement -

आपण पाहिलं तर कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकांनी अशाचप्रकारे प्रेशर कुकरचा वापर भाज्या सॅनिटाइझ करण्यासाठी केला होता. कुकरची शिट्टी काढून त्याठिकाणी छोटा पाइप अटॅच करुन त्यातून येणारी वाफ भाज्यांवर मारुन भाज्या सॅनिटाइज केल्या होत्या.


हेही वाचा – Parag Agrawal : Twitter चे CEO पराग अग्रवाल JEE परीक्षेत थेट पर्यवेक्षकांशी भिडले होते

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -