घरलाईफस्टाईलहिवाळ्यात आवर्जून प्या गाजराचे पौष्टीक सूप

हिवाळ्यात आवर्जून प्या गाजराचे पौष्टीक सूप

Subscribe

हिवाळ्यात गाजर खाणे प्रकृतीस फायदेशीर असून यात व्हिटामीन्सचा खजिनाच असतो. त्यामुळे हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण तर होतेच तसेच डोळ्यांनाही फायदा होतो.

गाजरामध्ये व्हिटामीन ए, के, सी, पोटॅशियम फायबर कॅल्शियम आणि आर्यन असते. यामुळे गाजर आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. हिवाळ्यात गाजराचे सूप आवर्जून प्यावे.

- Advertisement -

साहीत्य- दोन वाटी बारीक कापलेले गाजराचे तुकडे, दोन चमचे ठेचलेले आले, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, ३ चमचे तेल, मीठ चवीनुसार, १ चमचा साखर, एक चमचा काळीमिरी पावडर, दोन चमचे लिंबाचा रस.

कृती- सर्वप्रथम गॅसवर पसरट भांड्यात तेल गरम करून घ्यावे. त्यात जीरं, ओवा, टाकून परतून घ्यावे. नंतर त्यात गाजराचे तुकडे आणि आलं टाका. नंतर त्यात तीन कप पाणी टाकून मिश्रण शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

- Advertisement -

गॅसवर पॅन ठेवा. त्यात हे मिश्रण टाका. साखर, मीठ टाकून दहा मिनिटे शिजवा. दहा मिनिटांनी त्यात लिंबाचा रस टाका. गरमागरम गाजर सूप पिण्यास द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -