घरताज्या घडामोडीMaharashtra Rains: आज मुंबईसह राज्यातील 'या' भागात हलका ते मध्यम...

Maharashtra Rains: आज मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

Subscribe

पावसामुळे मुंबईतील वाहतूकीवर मोठा परिणाम

राज्यात काल पासून सुरू असलेल्या पावसाने रात्री थोडी विश्रांती घेतली होती मात्र सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात पुढील २-३ तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई,ठाणे तसेच पालघर ,रायगड जिल्ह्याला पुढील काही तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी,सिंधुदूर्ग,कोल्हापूर,पुणे आणि नाशिक,धुळे,उस्मानाबाद,सातारा जिल्ह्याला देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसह उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पाऊस ३ डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या पासून राज्यातील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या ५ दिवसात अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे एक द्रोणीय भाग कच्चपर्यंत गेला आहे. त्याचा प्रभाव राज्यातील कोकण,उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सर्वाधिक असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईतील काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील वाहतूकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई लोकल उशिराने धावत आहे. सेंट्रल रेल्वेवरील लोकल गाड्या १०-१५ मिनिटांनी उशिरा सुरू आहेत. राज्यातील अवकाळी पावसामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना देखील अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीतील ९५ टक्के मच्छिमारांच्या बोटी किनाऱ्यालगत आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील मिरकरवाडा,राजीवाडा,साखरीनाटे,जयगड बंदरातील बोटी किनाऱ्यालगत थांबल्या आहेत.

देशातील अनेक राज्यांना ‘जोवाड’ चक्रीवादळाचा धोका

राज्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच आता अनेक राज्यांना जोवाड चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्रा किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने याठिकाणी जोवाड चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – मास्कबाबात जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी वापरला रणवीरच्या ’83’ मधला डायलॉग

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -