घरटेक-वेकWhatsApp Update : २० लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअप बंद, नेमकं कारण काय?

WhatsApp Update : २० लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअप बंद, नेमकं कारण काय?

Subscribe

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे. भारतातही याचे सर्वाधिक युजर्स आहेत. मात्र WhatsApp कडून नुकतील एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट जाहीर करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, WhatsApp ने ऑक्टोबर महिन्यात जवळपास २० लाखाहून अधिक भारतीयांचे अकाउंट बंद अर्थात ब्लॉक केले आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात WhatsApp ला ५०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे व्हॉटस्अपने जवळपास २० लाखाहून अधिक व्हॉट्सअप अकाउंट बंद केले आहे. व्हॉट्सअपने सोमवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, +91 पासून सुरु होणारे जवळपास २,०६९,०० व्हॉट्सअप अकाउंट बंद केले आहेत.

व्हॉट्सअप अँड-टू-अँड एन्क्रिप्टेड मॅसेजिंग सेवांमधील दुरुपयोग थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावर व्हॉट्सअपने सांगितले की, व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवरील युजर्सची सुरक्षितता जपण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आर्टिफिशल इंटेलिजेन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिकांचा डेटा आणि विश्लेषणाचा वापर करत आहोत.

- Advertisement -

दर महिना ८ लाख युजर्सकडून व्हॉट्सअपचा दुरुपयोग

कंपनीने म्हटले की, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त निर्बंध हे स्वयंचलित किंवा बल्क मेसेजिंग (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे घातले आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp कंपनीने म्हटले की, WhatsApp चा दुरुपयोग थांबवण्यासाठी दरमहा जवळपास ८ लाख युजर्सचे अकाउंट ब्लॉक किंवा बंद केले जात आहेत. अशाप्रकारे २.२ मिलियन भारतीयांचे व्हॉट्सअप अकाउंट बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात जवळपास ५६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

व्हॉट्सअपकडून पाचव्यांदा रिपोर्ट जाहीर

मेसेजिंग अॅपनुसार, IT नियम २०२१ नुसार, व्हॉट्सअपने ऑक्टोबर महिन्यात आपला पाचवा मासिक अहवाल प्रसिद्ध केला. (Intermediary Guidelines and Digital Ethics Code Rules 2021) यामध्ये कंपनीने त्यांच्याकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यांनी यावर काय कारवाई करण्यात आली हे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

WhatsApp कडून का केले जाते अकाउंट Ban?

WhatsApp कंपनीच्या मते, जेव्हा कोणतेही बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणे, धमकावणे, त्रास देणे आणि द्वेषयुक्त भाषण किंवा वांशिक किंवा वांशिक भेदभाव करणे किंवा अन्यथा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अन्यायकारक अशा स्वरुपाचा कंटेंट शेअर करणाऱ्या अकाउंटवर व्हॉट्सअप बंदी घातले. या व्यतिरिक्त जर एखादा यूजर्स व्हॉटसअॅपच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करत असेल तर त्याचेही अकाउंट बंद केले जाते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -