घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी

महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी

Subscribe

राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरे यांची ईडीने चौकशी केली. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा लागला आहे.

प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिली असून अहमदनगरमधील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याला देखील कर्ज दिलं होतं. त्यानंतर कर्ज फेड न केल्यानं बंकेने हा कारखाना जप्त केला होता. त्यानंतर २०१२ साली हा कारखाना लिलावात काढण्यात आला. प्राजक्त तनपुरे यांनी हा कारखाना १३ कोटींना विकत घेतला. कारखान्याची मूळ किंमत २६ कोटी आहे. त्यामुळे कारखाना खरेदी विक्री व्यवहारावर ईडीला संशय आहे. याच अनुषंगाने ईडीने प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावून मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार प्राजक्त तनपुरे चौकशीसाठी हजर झाले होते.

- Advertisement -

याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार भावना गवळी, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोर जावं लागलं आहे.

- Advertisement -

प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत राहुरीमधून भाजपचे शिवाजी कर्डीले यांचा त्यांनी पराभव केला होता. तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -