घरताज्या घडामोडीLive Update: महाराष्ट्रात २४ तासात ७०४ कोरोनाबाधितांची नोंद, १६ रुग्णांचा मृत्यू

Live Update: महाराष्ट्रात २४ तासात ७०४ कोरोनाबाधितांची नोंद, १६ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात २४ तासात ७०४ कोरोनाबाधितांची नोंद, १६ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासात राज्यात एकूण ७०४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ६९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच १६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात ६ हजार ४४१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -


भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा वाराणसीमध्ये दाखल, सोमवारी काशी विश्वनाथ धानचे उद्घाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वाराणसी दौऱ्यावर

- Advertisement -


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा विमानतळावर दाखल झाल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा महत्त्वाचा असणार आहे. काही दिवसांपुर्वी ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबरला वाराणसी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करणार


शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत रविवार १९ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात आयोजित बैठकीत लावणार उपस्थिती


पुढील परीक्षेची जाबाबदारी म्हडा घेणार असून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही – जितेंद्र आव्हाड

(सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


म्हाडा पेपर फुटल्याच्या प्रकरणामध्ये सायबर सेल तपासासाठी रवाना
राज्यात औरंगाबाद, जालान, बीड, पुणे आणि ठाण्यात सायबर सेलकडून चौकशी सुरु
औरंगाबादमध्ये टार्गेट करियर पॉईंट संस्थेचा अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमी संचालक कृष्णा जाधव यांच्या सहभागाबाबत माहिती मिळाली असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.


देशातील आणि राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. समाजात असलेला बदल आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांच्या यातना आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अस्वस्थ होतो तोच खरा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता – शरद पवार

समस्या जाणून घेतल्यानंतर अस्वस्थ होतो तोच खरा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता – शरद पवार (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


वैचारिक संघर्ष झाल्याने मी पक्ष सोडून जाणार होतो परंतु शरद पवारांचा फोन आला…. नवाब मलिकांकडून शरद पवारांच्या वाढदिवासानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ७,७७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ३०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


८१ वाढदिवसानिमित्त शरद पवार यांचे खास औक्षण करण्यात आले


वरळी नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबियांकडून पवारांना खास पुष्पगुच्छ भेट देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


अवंतीपोरा बारागाम येथे एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे.


म्हाडाच्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -