घरताज्या घडामोडीआश्रमशाळेतल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

आश्रमशाळेतल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

Subscribe

नाशिकच्या हरसूल भागातील बोरीपाडा येथील घटना, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत नववीत शिकत असलेली रोहिणी बापू वड या विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेत वस्तीगृहात आत्महत्या केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

हरसूल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे माध्यमिक, तसेच उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. खडकओहोळ येथील रोहिणी बापू वड ही या आश्रमशाळेत नववीत शिकत होती. रविवारी (दि.१२) पाऊणे बाराच्या सुमारास विद्यार्थी दुपारच्या सत्रात भोजनगृहाकडे जेवणासाठी गेल्यानंतर रोहिणीने मात्र भोजनगृहात न जाता माझ्यासाठी जेवायला डबा इकडेच घेऊन ये, असं सांगितलं. सर्व विद्यार्थिनी गेल्यानंतर स्वतःच्या ओढणीने गळफास घेत तिने आत्महत्या केली. जेवणानंतर परतलेल्या विद्यार्थिनींनी दरवाजा वाजवूनही कडी उघडली जात नसल्याचे अधीक्षकांना सांगितले. त्यानंतर तातडीने धाव घेत अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी कडी तोडून प्रवेश केल्यानंतर रोहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. पोलीस पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह हरसूल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -