घरदेश-विदेशKashi Vishwanath Corridor : पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ परियोजना पूर्ण करणाऱ्यांचे...

Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ परियोजना पूर्ण करणाऱ्यांचे मानले आभार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी येथे श्री काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. काशी विश्वनाथ मंदिरातील पूजेच्या विधीनंतर मोदींनी मंदिर संकुलाततील सफाई कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे आभार मानले. तसेच काशी विश्वनाथ परियोजना पूर्ण करणाऱ्या कारागीर, सिव्हिल इंजिनियरिंगशी संबंधीत कर्मचारी, प्रशासकीय लोक आणि ज्या लोकांनी घराची जागा यासाठी दिली त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच उत्तर प्रदेशचे सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मोदींनी अभिनंदन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “आज या भव्य परिसराचे निर्माण करणाऱ्या मजुरांप्रति आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळेच हे शक्य झालेय. कोरोना काळातही न थांबता मजुर काम करत होते. ज्यांचा घामातून हे भव्य कॉरिडॉर उभारणे शक्य झाले. आमची वााराणसी युगानुयुगे जगली आहे. इतिहासाचा ऱ्हास होताना तिने पाहाला आहे. किती कालखंड गेले, किती सत्ता निर्माण झाल्या मातीत मिसळल्या तरीही बनारस आजही शिल्लक आहे.”

- Advertisement -

“औरंगजेब आला तरी शिवाजीही उभा राहतो.”

पीएम मोदी पुढे म्हणाले की, “काही काळापासून दहशतवाद्यांची नजर काशीवर आहे. पण इथे औरंगजेब आला तरी शिवाजीही उभा राहतो. जर कोणी शत्रू येथे फिरला तर राजा सुहेलदेवसारख्या शूर योद्ध्याने त्याला आपल्या एकतेची शक्ती दाखवतो. आणि इंग्रजांच्या काळातही काशीच्या लोकांनी हेस्टिंगची काय अवस्था केली होती हे काशीच्या लोकांना माहीत आहे. आक्रमणकर्त्यांनी या शहरावर हल्ला केला, शहर नष्ट करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाच्या अत्याचाराचा, त्याच्या दहशतीचा इतिहास साक्षीदार आहे. ज्यांनी तलवारीने सभ्यतेला बदलण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी धर्मांधतेने संस्कृतीला चिरडण्याचा प्रयत्न केला. पण या देशाची माती इतर जगापेक्षा काहीशी वेगळी आहे.”

- Advertisement -

“काशीत एकच सरकार आहे ज्याच्या हातात डमरु आहे”

“काशी म्हणजे काशी!. काशी अविनाशी आहे. काशीत एकचं सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरु आहे. त्यांचे सरकार आहे. ज्या काशीत गंगा प्रवाह बदलून वाहते तिला कोण रोखू शकेल?” असेही पंतप्रधान म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरण याठिकाणी लागलेत, राणी लक्ष्मीबाईंपासून ते चंद्रशेखर आझाद यांच्यासह कित्येक स्वातंत्र्य सैनिकांची जन्मभूमी कर्मभूमी काशी आहे. भारतेन्दु हरिश्चंद्र, जयशंकर प्रसाद, मुशी प्रेमचंद, पंडित रविशंकर आणि बिस्मिल्लाह खान अशा प्रतिभावान लोकांचा इतिहास आहे.” असंही पंतप्रधान म्हणाले.

“३ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ ५ लाख स्क्वेअर फूट झाले” 

पीएम मोदी म्हणाले की, “जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा तुम्हाला केवळ श्रद्धेचेच दर्शन होणार नाही, तर तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा अभिमानही वाटेल. पुरातनता आणि नावीन्य एकत्र कसे जिवंत होत आहेत, प्राचीन काळातील प्रेरणा भविष्याला कशी दिशा देत आहेत, याची झलक विश्वनाथ धाम संकुलात पाहत आहोत.”

पीएम मोदी म्हणाले की, “विश्वनाथ धामचे हे संपूर्ण नवीन संकुल ही केवळ भव्य इमारत नाही, तर ते एक प्रतीक आहे, ते आपल्या भारताच्या सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे, ते आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे प्रतीक आहे. हे भारताच्या प्राचीनतेचे, परंपरांचे प्रतीक आहे. भारताची ऊर्जा, गतिमानता. पूर्वी येथे केवळ तीन हजार चौरस फुटांमध्ये असलेले मंदिराचे क्षेत्र आता सुमारे पाच लाख चौरस फूट झाले आहे. आता मंदिर आणि मंदिर परिसरात ५० ते ७५ हजार भाविक येऊ शकतील. म्हणजे आधी गंगा मातेचे दर्शन-स्नान आणि तेथून थेट विश्वनाथ धामचे दर्शन घेऊ शकतील.” असही पंतप्रधान मोदी म्हणाले.


Kashi Vishwanath corridor: तब्बल २८६ वर्षानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण, शेकडो वर्षांचा इतिहास

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -