घरताज्या घडामोडीDrone Vaccination : ड्रोनद्वारे लसीकरण मोहिम, पालघरमध्ये राज्यातील पहिलाच प्रयोग

Drone Vaccination : ड्रोनद्वारे लसीकरण मोहिम, पालघरमध्ये राज्यातील पहिलाच प्रयोग

Subscribe

पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे आता लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये आज(गुरूवार) या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आणि लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने हा प्रयोग राबवण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे राबवण्यात येणाऱ्या नवीन प्रयोगामुळे अतिदुर्गम भागात वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होणार आहे. संपूर्ण देशात सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका घोंघावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र, लसीकरण पूर्ण करण्यात यावं यासाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एक अनोखा प्रयोग राबवण्यात येत आहे.

- Advertisement -

जव्हार तालुक्याने एक पाऊल पुढं टाकलं असून अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लसपुरवठा करण्याचा नावीन्य पूर्व प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागामध्ये जलद गतीन लसीचा पुरवठा करणं आणि शीतसाखळी अबाधित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक गोष्टींसाठी याचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, देशभरातील अनेक राज्यांत ओमिक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला असून ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत ४ नव्या ओमिक्रॉन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईमध्ये १३ ओमिक्रॉनचे रूग्ण आढळले तर वसई-विरारामध्ये १ ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Vijay Diwas 2021: भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दिलं बांगलादेशला स्वातंत्र्य, ९३ हजार सैनिकांनी पत्करली शरणागती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -