घरताज्या घडामोडीSkin care tips : त्वचा होईल चमकदार आणि कोमल ; फॉलो करा...

Skin care tips : त्वचा होईल चमकदार आणि कोमल ; फॉलो करा ‘या’टिप्स

Subscribe

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.त्यामुळे अनेकजण आपली त्वचा कोमल आणि तजेलदार होण्याकरिता बाजारातील अनेक उत्पादने वापरत असतात.त्यामुळे त्या उत्पादनांचा उपयोग झाला तरच होतो.याशिवाय जर ते उत्पादन त्वचेला सुट झाले नाही तर,त्याचे साईड इफेक्ट होतात.त्यामुळे या उत्पादनांना बळी न पडता घरच्या घरी खालील टिप्स फॉलो करा, जेणेकरुन तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. बेसन हे त्वचेला निस्तेज करण्यासाठी फायदेशीर ठरते.थंडीमध्ये त्वचेला ग्लोइंग आणि तजेलदार करण्यास मदत करते.

हळदी आणि बेसनचे फेसपॅक

- Advertisement -

त्वचा चमकदार आणि कोमल होण्यासाठी बेसन आणि हळदीचे फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा फायदा होतो.

लिंबू आणि बेसन फेसपॅक

- Advertisement -

ऑयली त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी बेसन आणि लिंबाचे मिश्रण फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची त्वचा ग्लो होण्यास मदत होईल

टोमॅटो आणि बेसन फेसपॅक

टोमॅटो रस आणि बेसनचे मिश्रण करुन फेसपॅक तयार करुन चेहऱ्याला लावावा.त्यामुळे कोरड्या त्वचेपासून लवकरच सुटका मिळेल.

गुलाब पाणी आणि बेसन

त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी बेसनामध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावा.

बेसन आणि नारळाचे तेल

तजेलदार चेहरा मिळवण्यासाठी बेसन आणि नारळाचे तेल मिसळून एक पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा कोमल होईल.

बादाम तेल आणि बेसन

त्वचेचा रुक्षपणा दूर करण्यासाठी बेसनामध्ये बादाम तेल मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहरा तजेलदार होतो.


हे ही वाचा – ‘मुली चुकीच्या मार्गाने जातील’; मुलींचे लग्नाचे वय २१ केल्याने मुस्लिम संघटनाची प्रतिक्रिया


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -