घरताज्या घडामोडीरोहिणी खडसेंकडून जीवाला धोका, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप

रोहिणी खडसेंकडून जीवाला धोका, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग करुन धमकावलं असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. या आरोपांमुळे जळगावमध्ये महाविकास आघाडीमध्येच बिघाडी झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी महिलांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. महिला सुरक्षित नाहीत असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसेंनी महिलांना त्रास आणि विनयभंग करणाऱ्यांना चोपच नाही तर हात तोडून टाकू असा इशारा दिला आहे. यामुळे वाद चिघळला आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की, वेळ पडल्यास आमदारांना चोपच नाही तर हात तोडून टाकू. माझ्याविषयी असलेल्या संतापामुळे माझ्या जीवाला धोका आहे. असे शिवसेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

आम्ही माता जीजाऊंच्या लेकी आहोत असे असताना कोणत्या महिलेच्या अंगावर हात टाकत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. महिलांना त्रास देणारे शिवसेनेचे कार्यकर्ते, आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी समज दिला नाही तर आम्ही चोपच देऊ. आम्ही महिला आहोत आमच्या इज्जतीवर कोणी हात टाकला तर आम्ही सहन करणार नाही असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. तुमचेही घरदार आहे तुमच्या घरावर कोणावर परिस्थिती आली तर असेच वक्तव्य कराला का? असा सवालही रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुक्ताईनगर शहरात शनिवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुक्ताईनगर शहर अध्यक्षा निताताई यांच्या घराबाहेर काही गावगुंडांनी राडा घातला होता. या गुडांनी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवला, त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. नीताताईंनी रोहिणी खडसे यांना फोन करुन तात्काळ येण्याची विनंती केली. तात्काळ या नाहीतर आम्ही जिवंत राहणार नाही असे नीताताई म्हणाल्या असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. दरम्यान जे गुंड आले होते त्यांनी आपण चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत धमकी दिली की, जर चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोस्ट टाकली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे रोहिणी खडसे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -