घरदेश-विदेशWeather Updates : बर्फवृष्टीमुळे सिक्किममध्ये १ हजारांहून अधिक पर्यटक अडकले, आर्मीचे रेस्क्यू...

Weather Updates : बर्फवृष्टीमुळे सिक्किममध्ये १ हजारांहून अधिक पर्यटक अडकले, आर्मीचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Subscribe

सिक्कीममधील चांगु तलाव हे जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच एक आकर्षणाचे ठिकाण आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत पर्यटनासाठी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असते. या तलावाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये या तलावाच्या पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे कोरोनानंतर हे तलाव पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, परंतु शनिवारपासून सिक्कीममध्ये मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. यामुळे तलाव पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

सतत सुरु असणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जवाहरलाल नेहरु रोड बंद करण्यात आलाय. त्यामुळे बहुतांश पर्यटक हे चांगु लेक परिसरात अडकून पडले आहेत. या अडकून पडलेल्या पर्यटकांना बर्फवृष्टी झेलावी लागतेय, त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी इंडियन आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. रविवारी रात्रीपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. जवळपास १००० हून अधिक पर्यटक याठिकाणी अडकल्याचा अंदाज आहे. यावेळी रेस्क्यू केलेल्या पर्यटकांसाठी जवळच्या आर्मी कॅम्पस एरियामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी या लेक परिसरात अडकलेल्या पर्यटकांना दोन ग्रुप्समध्ये विभागण्यात आले. या दोन्ही ग्रुप्सना ४० किलो मीटर गंगटोकपर्यंत पायी जाण्यास सांगण्यात आले. त्य़ानंतर आर्मीच्य़ा जवानांनी त्यांना पुन्हा रेस्क्यू केले. हे रेस्क्यू ऑपरेशन सोमवारपर्यंत सुरु राहिल असा अंदाज व्यक्त होतोय.


नाशिक, धुळे, नंदूरबारमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -