घरताज्या घडामोडीराज्य मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यपालांवर बंधनकारक पण..., संजय राऊतांचा घणाघात

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यपालांवर बंधनकारक पण…, संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतो परंतु राज्यपाल भगसिंह कोश्यारी अभ्यास करण्यात व्यस्त आहेत. असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची फाईल राज्यपालांना दिली आहे. राज्यपालांनी यावर अद्याप निर्णय दिला नाही. तसेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यपाल फार अभ्यासू आहेत. इतका अभ्यास बरा नाही. अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. त्यामध्ये तुम्ही असा अभ्यास करायला लागला आहात. घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्यात त्यानुसार तुम्हाला काम करायचे आहे. घटनेमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की, राज्यमंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी मान्य करायची आहे. १२ आमदारांचा प्रश्न गेल्या १२ महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्या शिफारशी मान्य कराव्यात असे राज्यपालांवर बंधनकारक आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरु आहे. शांतता… अभ्यास सुरु आहे. असं नाट्य राजभवनात सुरु आहे. त्याचे पात्र राज्यपाल नसून भाजपचेही प्रमुख नेते आहेत. हे नाटक ५० टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारची पथनाट्य सुरु असतात असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

विरोधक नाराज होतात

महाराष्ट्राच्या बाबत चांगले आणि सकारात्मक घडले, कौतुकाची थाप पडली की महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नाराज होतो. हा आजार असतो त्यावर कसा उपचार करायचा ते पाहू असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणात चौकशी सुरु

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कणकवलीतील शिवसैनिकावर झालेल्या हल्ला प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, ही कायदेशीर बाब आहे. तिकडचे पालकमंत्री आहेत ते यावर बोलतील. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. कोणीही काही गुन्हा केला तर त्याच्यावर कारवाई होते.

- Advertisement -

हेही वाचा : हा तर राज्यपाल म्हणजेच पर्यायानं घटनेचा अवमान, चंद्रकांत पाटलांचा मविआवर हल्लाबोल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -