घरताज्या घडामोडीHealth Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून...

Health Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून घ्या फायदे

Subscribe

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात ओरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. आरोग्य नेहमी सुदृढ राहण्यासाठी आपण आपल्या आहारात नेहमीच पोष्टीक पदार्थांचा समावेश करत असतो. फळांमधून आपल्या शरीराला अनेक जीवनसत्त्व मिळत असतात. फळांमध्ये विशेषत: केळ्यांचा समावेश असल्यास शरीराचे आरोग्य सुधारण्याबरोबर त्वचेचा तजेलपणा वाढवण्यासाठीही केळी गुणकारी ठरत असतात. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत पिवळी केळी खात असाल मात्र लाल केळ्यांचा आस्वाद कधी घेतला आहे का? जाणून घ्या काय आहे या लाल केळ्यांचे फायदे.

जाणून घ्या लाल केळ्यांचे फायदे

  • लाल केळ्यांमध्ये कॅरोटीनाईड्स असते त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे बळकट होण्यास मदत होते.
  • याशिवाय या केळ्यांमध्ये फायबर्स आणि फॅट्सचे प्रमाण खूप कमी असते,त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • या केळ्यांमध्ये असणारे ट्रायटोफन मेंदू शाबूत राहण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठीही गुणकारी ठरते.
  • लाल केळी नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते.
  • याशिवाय या लाल केळ्यांच्या सेवनाने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
  • या लाल केळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि बी ६ उपलब्ध आहे
  • लाल केळ्यांमधील अँन्टी ऑक्सिडंटमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास चांगला फायदा होतो.त्यामुळे अॅनिमियापासून तुमचा बचाव होतो.

कुठे मिळतात ही ‘लाल केळी’

- Advertisement -

लाल केळी ही लालसर- जांभळ्या रंगाची असून, ही केळी पिकल्यावर त्यांच्या सालांचा रंग हा फिकट गुलाबी रंगाचा होतो. ही केळी साधारण केळयांपेक्षा मृदू आणि गोड असतात. या केळ्यांचे उत्पादन हे पूर्व आफ्रिका,दक्षिण अमेरिका ,युएई या देशांत होते.मध्य अमेरिकेत या लाल केळ्यांचे उत्पादन जास्त होत असून,ही लाल केळी जगभरात कुठेही मिळतात.ही लाल केळी मुबईमधील मांटूंग्यातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. ही लाल केळी आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरत असून, तमिळ,तेलगू भागातील लोक या लाल केळ्यांचा आपल्या आहारात समावेश करतात. विकी – कतरीनाच्या लग्नातील जेवणातही लाल केळ्यांच्या मेन्यूचा समावेश होता.


हे ही वाचा – Nutrition Tips: ब्रँडी, रम नाही तर ‘हे’ पेय ठेवेल हिवाळ्यात शरीर उष्ण

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -