घरCORONA UPDATEMumbai corona virus Update: मुंबईत वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५,६३१ नव्या रुग्णांची...

Mumbai corona virus Update: मुंबईत वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५,६३१ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारीत नवीन वर्षासाठी नवे आव्हान घेऊन आली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख कायम आहे. मुंबईत आजही धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे. मुंबईत शुक्रवारी ५ हजार ६३१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हिच संख्या ३ हजार ६७१ इतकी होती. आज मुंबईच्या रुग्णसंख्येत तब्बल २ हजारांची वाढ झाली आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात ५४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत काल शून्य मृत्यू नोंद करण्यात आली होती. मात्र आज मुंबईत एका रुग्णांचा मृत्यू झाला आह. मुंबईत सध्या एकूण १६ हजार ४४१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारीत नवीन वर्षासाठी नवे आव्हान घेऊन आली आहे.

मुंबईत शुक्रवारी एकूण ४७ हजार ४७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ५,६३१ पॉझिटिव्ह आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४९७ रुग्ण आज उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी मृतांचा आकडा वाढलेला नाही. मात्र वाढती रुग्णसंख्या ही मुंबईकरांचा जीवाला घोर लावणारी आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के इतका आहे. २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात मुंबईत नोंद झालेल्या रुग्णांचा दर हा ०.२० टक्के इतका आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबईतील रुग्णसंख्या वाढू लागली आहे तसे मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या देखील वाढू लागली आहे. मुंबईत सध्या ११ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत. तर १२८ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईत कोरोना, ओमिक्रॉनसह डेल्टा व्हेरिएंटची संख्या ही वाढत आहे. मंबईत आज एकूण २८२ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

 

राज्यात आज एकूण ८ हजार ६७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ४ रुग्ण हे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहेत. तर आज १ हजार ७६६ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ५०९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – मुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; ‘या’वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -