घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात एकही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद नाही; ४०,९२५ नव्या...

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात एकही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद नाही; ४०,९२५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

Subscribe

राज्यातील आज एकाबाजूला दैनंदिन रुग्णसंख्येने ४० हजार पार केले असले तरी दुसऱ्याबाजूला राज्यात एकही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली नाही. राज्यातील चिंतेच्या वातावरणात ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ९२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन २० जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर १४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील आज दिवसभरात एकही ओमिक्रॉनबाधित आढळला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६८ लाख ३४ हजार २२२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ६१४ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लाख ४७ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १ लाख ४६ हजार ३२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६८ लाख ३४ हजार २२२ (९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत आढळेल्या ८७६ ओमिक्रॉनबाधितांची पैकी ४३५ रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यात कुठे, किती ओमिक्रॉनबाधित आढळले? 

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

५६५*

पुणे मनपा

८३

पिंपरी चिंचवड

४५

ठाणे मनपा

३६

नागपूर

३०

पुणे ग्रामीण

२९

पनवेल

१७

नवी मुंबई आणि कोल्हापूर

प्रत्येकी १०

सातारा

१०

कल्याण डोंबिवली

११

उस्मानाबाद

१२

भिवंडी निजामपूर मनपा

१३

वसई विरार

१४

नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर

प्रत्येकी ३

१५

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, आणि सांगली

प्रत्येकी २

१६

लातूर, अहमदनगर, अकोला, आणि रायगड,

प्रत्येकी १

एकूण

८७६


हेही वाचा – लॉकडाऊनची अफवाच


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -