‘यशराज फिल्म्स’ चा आगामी चित्रपट “थग्स ऑफ हिन्दुस्तान” मध्ये बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकाचवेळी रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटा येण्यापूर्वी आमिर आणि बिग बी आपल्या छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. सध्या टिवीवर सुरु असलेली मालिका ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये आमिर खान आला होता. आमिरसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याची शुटिंग गुरुवारीच पूर्ण झाली आहे. मालिकेच्या या भागात आमिरने शुटिंगदरम्यानचे अनुभव लोकांशी शेअर केले आहेत. बिग बीं सोबत ‘कोन बनेगा करोडपती’च्या सेटवर घेतलेली सेल्फी आमिरने नुकतीच आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. या फोटत आमिर खान लाल चेक्सच्या कोटमध्ये तर बिग बी सुद्धा निळ्या रंगाच्या कोटमध्ये आहेत.
का मागितली माफी
आमिर खान ने आपल्या आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या सेल्फी खाली मजकूर लिहिला आहे. यामध्ये त्याने बिग बींची माफी मागितली आहे. “माझा आजचा दिवस खूप चांगला गेला. मी बच्चनजीं बरोबर केबीसीची शुटिंग संपवली आहे. मला खूप मजा मिळाली. सर, माझ्या सर्व विनंत्यांसाठी क्षमा करा !!! मी स्वःताला थांबवू शकलो नाही!
What an exciting day I have had! Just finished shooting for KBC with Mr.Bachchan. Had so much fun. Sir, sorry for all my requests! Couldnt control myself!@SrBachchan pic.twitter.com/6r3ebz3S9F
— Aamir Khan (@aamir_khan) October 25, 2018
प्रमोशनचे काम सुरु
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट म्हणजेच आमिर खान लवकरच पुन्हा आपल्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आमिरचा आगामी चित्रपट “थग्स ऑफ हिन्दुस्तान” येत्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनचे काम सुरु आहे. चित्रपटात अभिनयाचा चे काम जसे परफेक्ट करतो तसेच प्रमोशनवरही आमिरचा भर असतो. केबीसीमधील शुटिंग ही प्रमोशनचाच एक भाग आहे. यामध्ये आमिरने बिग बींना विनंती केली असल्याचे समजते आहे. त्यामुळे आमिर आणि बिग बींचे फॅन्स या भागाची आतूरतेने वाट बघत आहेत.