आमिर – अमिताभ थिरकले ‘वाशमल्ले’ गाण्यावर

'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटातील पहिल वहिल गाणं 'वाशमल्ले' नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यावर आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र थिरकताना दिसत आहेत.

aamir khan and amitabh bacchan
ठग्ज ऑफ हिंदुस्तानमधील वाशमल्ले गाणं (सौजन्य-टाईम्स नाऊ)

आमिर खान, अमिताभ बच्चन, कॅटरीना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटातील पहिल वहिल गाण नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर आता याच्या पहिल्या गाण्याची झलक ‘वाशमल्ले’ रिलीज करण्यात आल आहे. या गाण्यात आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र थिरकताना दिसत आहेत. दोघेही बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार असून ही जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लोकप्रीय कादंबरीवर आधारीत कथा

‘वाशमल्ले’ हे गाण सुखविंदर सिंग आणि विशाल दादलानी यांनी गायले असून अजय-अतुल यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. तर हे गाण अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तसेच बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांना थिरकवण्याचे काम नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी केले आहे. हा चित्रपट एपिक अॅक्शन-अॅडवेंचर फिल्म ब्रिटिश लेखक आणि प्रशासक फिलिप मीडोज टेलर यांच्या १८३९ साली आलेल्या ‘कंफेशंस ऑफ ए ठग’ या कादंबरीवर आधारीत आहे. अशा एका भामट्याच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटाची कथा आहे, जो १९ व्या शतकात भारतामध्ये इंग्रजांसाठी डोकेदुखी बनला होता.