शेमारू एंटरटेनमेंटचे लोकप्रिय हिंदी मनोरंजन चॅनेल शेमारू टीव्ही ‘क्राइम वर्ल्ड’ हा क्राईम शो घेऊन येत आहे. या उत्कंठावर्धक शोमध्ये गुन्हेगारीच्या जगाचा मुखवटा हटवला जाईल आणि गुन्हेगारीचा न पाहिलेला चेहरा सर्वांसमोर येईल. हा कार्यक्रम शेमारू टीव्हीवर 1 फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवारी प्रसारित करण्यात येणार आहे.
गुन्ह्यांचे जग हे आपल्या आणि आपल्या विचारांच्या पलीकडे आहे, त्यामुळेच आपल्याला दररोज अशा घटनांची माहिती मिळते, ज्या पाहूनच आपले केस उभे राहतील. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच बातम्या वर्तमानपत्राच्या मथळ्यात आपण सतत वाचतो. इच्छा नसतानाही अनेक जण गुन्हेगारीच्या या दुनियेचे बळी ठरतात.
हा शो आपल्याला गुन्हेगारीच्या अशाच काही न पाहिलेल्या ग्राउंड रिअॅलिटीमधून घेऊन जाईल, जेणेकरून जेव्हा तो आपल्या दारात ठोठावतो तेव्हा आपण सावध आणि सतर्क असायला हवे.शेमारू टीव्हीचा नवीन शो ‘क्राइम वर्ल्ड’ प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणार आहे. प्रत्येक नवीन भागासह नवीन रोमांचक आणि मनोरंजक कथांसाठी 1 फेब्रुवारी पासून ‘क्राइम वर्ल्ड’ रात्री 10:30 वाजता फक्त शेमारू टीव्हीवर नक्की पहा.
हे ही वाचा – Coronavirus: कोरोनापासून बचाव करेल धूप अगरबत्ती; बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील नव्या अभ्यासातून समोर