घरताज्या घडामोडीOSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे 'ओएसए' आजार

OSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे ‘ओएसए’ आजार

Subscribe

८० आणि ९० दशकात भारतात डिस्को संगीताला लोकप्रिय करणारे गायक आणि संगीतकार बप्पी लहरी आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मुंबई येथील जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ६९ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण डॉ. दीपक नामजोशी यांनी पीटीआयला सांगितले आहे. डॉक्टर म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात लहरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना सोमवारीच डिस्चार्ज देण्यात आला. पण मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी एका डॉक्टराला घरी बोलावले. पण त्यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना अनेक आरोग्यासंबंधित समस्या होत्या. मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) या कारणामुळे त्यांचे निधन झाले.’ ज्या आजारामुळे बप्पीदा यांचं निधन झालं तो नेमका आजार काय आहे? जाणून घ्या.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजे काय?

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजेच ओएसए. ही एक अशी शारिरीक समस्या आहे, ज्यामध्ये झोपेदरम्यान घशातील स्नायू खूप शिथिल होतात. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हटले जाते. या आजारातील गंभीर प्रकरणात ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेमुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होणे, लक्ष केंद्रीत करण्यात अडचण होते आणि चिडचिडेपणा होता. याचे प्रमुख कारण वजन वाढणे, जीभ आणि टॉन्सिलचा आकार मोठा होणे आहे.

- Advertisement -

ओएसएची लक्षणे

ओएसएमध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे त्यांची रात्रीची झोप होत नाही. मग सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. तसेच झोपेच्या दरम्यान नाकातून आवाज येऊ लावतो. हा आजार झोप आणि श्वाससंबंधित आहे. या आजारामुळे हवा बाहेर काढण्यासाठी फुफ्फुसांना जास्त काम करावे लागते. तसेच महत्त्वाचे म्हणजे या आजारात झोपताना श्वास मध्येमध्ये थांबतो. झोपेदरम्यान जोरात रुग्ण घोरत असतो. झोपेत असताना अचानक धाप लागते, ज्यामुळे झोपेतून जाग येते.

या लोकांना अधिक धोका

लठ्ठ लोकांना ओएसएचा होण्याचा अधिक धोका आहे.

- Advertisement -

ज्या लोकांना रात्रीच्या झोपदरम्यान नाक बंद होण्याची समस्या असते त्यांना ओएसए होण्याची शक्यता दुप्पट असते.


हेही वाचा – लहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय ; ‘ही’ आहेत सुरुवातीची लक्षण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -