घरमनोरंजनअनिर्बानच्या अफलातून Performance च्या हेमा मालिनी झाल्या दिवाण्या: दिलं हे खास गिफ्ट

अनिर्बानच्या अफलातून Performance च्या हेमा मालिनी झाल्या दिवाण्या: दिलं हे खास गिफ्ट

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरीवर टॅलेंट रियालिटी शो हुनरबाज (Hunarbaaz) प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या कार्यक्रमाचा मोठ्ठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. देशभरातील अनेक टॅलेंटेड कलाकार आपली कला सादर करण्यासाठी या शोमध्ये येतात. आता या रियालिटी शोला त्यांचे 14 निवडक स्पर्धक मिळाले आहेत. हळूहळू या शोमधील स्पर्धा कठीण होणार आहे. येत्या आठवड्यात टॉप 12 चे स्पर्धक होण्यासाठी या 14 स्पर्धकांमध्ये एक स्पर्धा रंगेल. येता आठवडा महिला दिनानिमित्त खास असल्यामुळे या आठवड्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महिला दिन स्पेशल गेस्ट असलेल्या हेमा मालिनींना स्पर्धक ट्रिब्यूट देणार आहेत.

या आठवड्यात हेमा मालिनी अनिर्बानची बासरी धुन ऐकून त्याला एक स्पेशल गिफ्ट देतील. यावेळी हेमा मालिनींना इंप्रेस करण्यासाठी सर्व स्पर्धांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे. आपल्या वेगवेगळ्या परफॉर्मंसने स्पर्धक हेमा मालिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतील. याचं दरम्यान उस्ताद अनिर्बान त्याच्या एका स्पेशल परफॉर्मंसने सगळ्यांना आकर्षित करणार आहे. या कार्यक्रमाचा नवीन व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हेमा मालिनी अनिर्बानवर इंप्रेस झालेल्या दिसून येत आहेत..

- Advertisement -

अनिर्बानच्या बासरीच्या धुनवर हेमा मालिनींनी धरला ठेका

अनिर्बानच्या परफॉर्मंसवेळी प्रत्येक जण हरवून जातो. यावेळी हेमा मालिनी म्हणतात की, एवढा लहान मुलगा इतकी छान बासरी कसा काय वाजवू शकतो? माझा तर विश्वास सुद्धा बसत नाही. त्यानंतर त्या अनिर्बान म्हणतात की, मी येताना मथुरेहून आलेय, त्यामुळे तुला बघून असं वाटतयं की तू गोपाळचं आहेस. वृंदावनातून आला आहेस का? इतकी सुंदर धुन वाजवतोस, जणू काही कृष्णचं बासरी वाजवत आहे. त्यामुळे तिकडून येताना मी तुझ्यासाठी काहीतरी खास भेट घेऊन आलेय.

हेमा मालिनीने अनिर्बानला एक बासरी गिफ्ट केली. त्यानंतर त्या म्हणाल्या की, सुंदर गोपालम असंम एक गाणं आहे, त्यावर तू धुन वाजवशील आणि मी त्यावर परफॉर्मंस करेन. त्यानंतर अनिर्बानने त्या गाण्यावर धुन वाजवली आणि हेमा मालिनीने त्यावर ठेका धरला. इतकचं नाही तर अनिर्बानच्या धुनवर मोहित होऊन हेमा मालिनीने त्याला एक मुकुट घातलं.


आलियाच्या ‘Gangubai Kathiawadi’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; 100 कोटींचा टप्पा केला पार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -