घरक्रीडाPAK vs AUS 2nd Test: पाकिस्तानच्या कर्णधाराने रचला इतिहास, १४५ वर्षांच्या कसोटी...

PAK vs AUS 2nd Test: पाकिस्तानच्या कर्णधाराने रचला इतिहास, १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही करता येणार नाही अशा रेकॉर्डची नोंद

Subscribe

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कराचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नवा रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे बाबरचं नाव आता महान फलंदाजांच्या यादीत समाविष्ट होऊ शकतं. कारण पाकिस्तान संघाला विजयासाठी ५०६ धावांचे आव्हान असताना देखील बाबरने सामन्याच्या शेवटच्या दिवशी १९६ धावा केल्या.

पाकिस्तान संघामध्ये पहिल्यांदा फलंदाज अब्दुल्ला शफीक ९६ धावांवर बाद झाला, त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पहिले शतक ठोकले. परंतु द्विशतक ठोकताना अवघ्या ४ धावांपासून त्याला दूर रहावं लागलं. पण असे असताना देखील बाबरने हा पराक्रम केला आहे. १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही करता येणार नाही अशा रेकॉर्डची नोंद बाबर आझमने केली आहे.

- Advertisement -

बाबर कसोटी इतिहासातील चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. बाबरच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्या मायकेल आथर्टन (१८५), बेव्हन कॉँगडन (१७६), डोनाल्ड ब्रॅडमन (१७३) आणि रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर आहेत. यावेळी, बाबर चौथ्या डावात सर्वाधिक वेळ खेळपट्टीवर उभा राहणारा फलंदाज बनला आहे.

या शानदार खेळीसह बाबर आझमने जगभरातील समीक्षक आणि गोलंदाजांसमोर आपला दर्जा आणखी उंचावला आहे. बाबर आझमने १९६ धावांची खेळी करताना ४२५ बॉल्स खेळले. त्याने २१ चौकार आणि एक षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबर डगमगला नाही. दुहेरी शतकाच्या अगदी जवळ असताना नॅथन लियॉनने टाकलेल्या बॉलवर लॅबुशेनने झेल घेतला आणि बाबरच्या द्विशतकाचं स्वप्न अपूर्ण राहीलं. विकेट गेल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. मात्र, चाहत्यांकडून त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Pune Expressway: होळी सेलिब्रेशनसाठी विकेंडला लोणावळ्याला जाताय ? वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -