घरक्रीडाWomen’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं रचला इतिहास; तीन दिग्गज...

Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं रचला इतिहास; तीन दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

Subscribe

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला आहे.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलिसी हिलीनं तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला आहे. अ‍ॅलिसी ही महिला व पुरुषांच्या कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे अॅलिसी हिलीनं १७० धावांत तीन दिग्गज खेळाडुंना मागे टाकलं आहे. त्यामुळं तिच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे.

अॅलिसी हिलीनं उत्कृष्ट विक्रम करत ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार क्रिकेटर आणि यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे. शिवाय वेस्ट इंडिजचे दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकत क्रिकेटविश्वात नवा इतिहास रचला आहे.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अॅलिसीनं १३८ चेंडूत २६ चौकार मारत १७० धावांची खेळी केली. फलंदाजीवेळी स्ट्राईक रेटही उत्तम म्हणजे १२३.१९ होता. अशाप्रकारे अॅलिसी कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.

याआधी हा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. गिलख्रिस्टनं २००७ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात १४९ धावा केल्या होत्या. तर रिकी पाँटिंग यानं २००३ सालच्या अंतिम सामन्यामध्ये भारताविरुद्ध १४० धावांची नाबाद खेळी खेळली होती. तसंच, दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी १९७९ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद १३८ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे एलिसाने समान गुणांसह ३ दिग्गजांना मागं टाकलं आहे.

- Advertisement -

एकदिवसीय विश्वचषक अंतिम समान्यातील सर्वोच्च धावसंख्या

  • १७० धावा – अॅलिसा हिली (२०२२)
  • १४९ धावा – अॅडम गिलख्रिस्ट (२००७)
  • १४०* धावा – रिकी पाँटिंग (२००३)
  • १३८* धावा – व्हिव्हियन रिचर्ड्स (१९७९)

क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३५६ धावा केल्या होत्या. यावेळी सलामीवीर अॅलिसा हिलीनं शतक झळकावलं. तसंच, रॅचेल हेन्सनं ६८ आणि बेथ मुनीने ६२ धावा केल्या. सलामीला येताना, एलिसानं रेचेल हेन्ससोबत १६० धावांची शानदार भागीदारी केली.


हेही वाचा – Video : स्वत:चे आयुष्य पडद्यावर पाहताना प्रवीण तांबेंच्या अश्रूंचा बांध फुटला; म्हणाले, ‘स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -