घरताज्या घडामोडीPakistan Political Crisis: पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला मोठा दिलासा, नॅशनल असेंब्ली डेप्युटी...

Pakistan Political Crisis: पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला मोठा दिलासा, नॅशनल असेंब्ली डेप्युटी स्पीकरनी अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारला तुर्त जीवदान मिळाले आहे. कारण इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव उप सभापतींनी फेटाळला आहे. विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचा निर्णय उप सभापतींनी दिला आहे. काही वेळापूर्वीच इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये कामकाज सुरू झाले होते. यावेळी पंतप्रधान इम्रान खान उपस्थित नव्हते. पण नॅशनल असेंब्लीच्या कामकाजानंतर काही वेळातच उपसभापती यांच्याकडून हा अविश्वासचा प्रस्ताव घटनाबाह्य ठरवण्यात आला आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची केली शिफारस 

अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान देशाला संबोधित करण्यासाठी लाईव्ह आले आणि म्हणाले की, ‘आज उप सभापतींनी आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. निवडणुका आहेत आणि लोकं निर्णय घेतात की, त्यांना कोण हवंय. बाहेरून कोणतेही षड्यंत्र होऊ देऊ नका आणि अशा भ्रष्ट लोकांनी या देशाचे भवितव्य ठरवू नका. देशाचा भवितव्याचा निर्णय पैशांच्या जोरावर घेतला जाऊ शकत नाही. त्यांचा सर्व पैसा वाया जाईल. मी आज माझ्या समाजाला सांगतो की, तुम्ही निवडणुकीची तयारी करा. देशात जे मोठे षडयंत्र रचले जात होते ते आज फसले आहे.’

- Advertisement -

आता सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव 

अविश्वासाचा प्रस्ताव फेटळाल्यानंतर विरोधी पक्ष आंदोलन करत आहे. या निर्णयामुळे विरोधी पक्षाचे नेते नाराज झाले असून आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – SriLanka Economic Crisis: देशव्यापी आंदोलनापूर्वी श्रीलंकन सरकारने लावला ३६ तासांचा कर्फ्यू; सोशल मीडियावर बंदी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -