घरताज्या घडामोडीDeva Gurjar Murder : कोटामधील गुंड देवा गुर्जरची दिवसाढवळ्या हत्या, लोखंडी पाईपने...

Deva Gurjar Murder : कोटामधील गुंड देवा गुर्जरची दिवसाढवळ्या हत्या, लोखंडी पाईपने हल्ला

Subscribe

राजस्थानमधील कोटाच्या जवळपास असलेल्या चित्तोडगढ जिल्ह्यातील रावतभाटामध्ये सोमवारी धक्कादायक घटना घडली आहे. कोटा जिल्ह्यात बोराबांस गावच्या देवा गुर्जर उर्फ देवा डॉनची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली आहे. संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता कुऱ्हाड, लोखंडी पाईप आणि दांड्याने देवावर ८ ते १० वेळा हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी देवा कोटा बॅरियर येथील नाक्यावर असलेल्या सलूनच्या दुकानात होता. जखमी अवस्थेत देवाला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोटामधील गुंड देवा गुर्जरची सोमवारी पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. सलूनच्या दुकानात बसलेल्या देवावर हल्लेखोरांनी हल्ला केला यामध्ये देवा गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोरांच्या टोळीचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. देवाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच ज्या बाजारात देवाची हत्या करण्यात आली ते ठिकाण सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवा गुर्जरवर दीड डझनहून अधिक संख्या असलेल्या टोळक्याने हल्ला केला आहे. हिस्ट्रीशीटर देवा गुर्जरने कोटाजवळ असलेल्या रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. पोलिसांनी देवाचा मृतदेह एमबीएस रुग्णालयातील शवगृहात ठेवला आहे. देवाच्या हत्येनंतर गुर्जर समाजात तीव्र असंतोष पसरला असून शवगृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली आहे. यामुळे येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टोळक्यांकडून देवावर धारधार शस्त्रास्त्राने हल्ला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार देवा सलूनच्या दुकानात बसला होता. तेवढ्यात एक टोळी तिथे आली आणि देवावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये देवावर वार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार देवावर गोळीबार देखील करण्यात आला आहे. मध्ये येणाऱ्यांवरसुद्धा हल्ला करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. टोळीने सलूनची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड केली आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ८० वर्षांच्या वृद्ध महिलेने राहुल गांधींच्या नावावर केली सर्व संपत्ती, जाणून घ्या कारण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -