घरदेश-विदेशJammu Kashmir खोऱ्यात 79 परदेशींसह 172 दहशतवादी सक्रिय; भारतीय लष्कराची माहिती

Jammu Kashmir खोऱ्यात 79 परदेशींसह 172 दहशतवादी सक्रिय; भारतीय लष्कराची माहिती

Subscribe

युद्धबंदीच्या उल्लंघनात कोणतीही वाढ झालेली नाही. या वर्षात आतापर्यंत शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही.

जम्मू- काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist ) सातत्याने चकमक सुरू आहेत. या चकमकींमध्ये आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्थान घातले आहे. दरम्यान तरीही काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी गटाच्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर खोऱ्यात 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी-मार्च) परदेशी दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, तर स्थानिक दहशतवाद्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. जम्मू- काश्मीरमध्ये सध्या एकूण 172 दहशतवादी सक्रिय आहेत. यात 79 परदेशी आणि 93 दहशतवादी हे स्थानिक दहशतवादी आहेत. जे जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. लष्कराच्या उत्तर कमांडने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. याचा अर्थ जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेले 45 टक्के दहशतवादी हे परदेशी आहे.

यातील 156 दहशतवादी हे काश्मीरमध्ये तर 16 दहशतवादी जम्मूमध्ये सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याशिवाय एकूण विदेशी दहशतवाद्यांपैकी 77 काश्मीरमध्ये आणि 02 जम्मूमध्ये सक्रिय आहेत.

- Advertisement -

अधिकृत आकडेवारीनुसार, 2022 मध्ये दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर 27 वेळा हल्ले केले. याशिवाय 8 दहशतवादी हल्ल्यांमध्ये जम्मू काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना लक्ष्य करण्यात आले, 2022 च्या पहिल्यात तीन महिन्यात 15 तरुण शस्त्रे धरून दहशतवादी बनले. हे तरूण आता जम्मू-काश्मीरमध्ये विविध दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेत.

अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. एवढेच नाही तर लष्कराने 23 ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांच्या विविध लपून बसलेल्या ठिकाणांवरून शस्त्रे जप्त केली आहेत. जम्मू-काश्मीरमधील शांतता प्रक्रिया बिघडवण्यासाठी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे चार प्रयत्न झाले, यापैकी 03 प्रयत्न हाणून पाडले. या प्रयत्नांमध्ये भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये 01 आणि जम्मूमध्ये 02 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

- Advertisement -

युद्धबंदीच्या उल्लंघनात कोणतीही वाढ झालेली नाही. या वर्षात आतापर्यंत शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 3 ते ४ एप्रिल 2022 रोजी रात्री भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टर, जिल्हा राजौरी (J&K) मध्ये नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न रोखला. यादरम्यान एका दहशतवाद्याचा मृतदेह आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान या भागात ऑपरेशन अजूनही सुरु आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -