घरपालघरनिवडणुकीतील विजयी उमेदवारांचे माहिती संकलन सुरू

निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे माहिती संकलन सुरू

Subscribe

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या पातळीवर माहिती संकलन करायचे प्रयत्न सुरू असतानाच १९६२ ते १९९४ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयी उमेदवारांची माहिती संकलीत करण्याचे काम पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या पातळीवर माहिती संकलन करायचे प्रयत्न सुरू असतानाच १९६२ ते १९९४ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयी उमेदवारांची माहिती संकलीत करण्याचे काम पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामात शालेय शिक्षकांना त्यांच्या या भागातील सदस्यांची माहिती देण्यासाठी दिवसातील पाच तासांचा वेळ देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात १९९४ पासून इतर मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देण्यात आले होते. मात्र १९६२ ते १९९४ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी आरक्षण उपलब्ध होते. यानुषंगाने या काळात सर्वसाधारण प्रवर्गातील निवडून आलेल्या इतर मागास गरीब उमेदवारांची माहिती संकलीत करण्याचे राज्य शासनाने जिल्हा पातळीवरील प्रशासनाला कळवले आहे.

जिल्ह्यातील १९६२ ते १९९४ दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाल्याबद्दलचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू असून प्राथमिक शाळेतील रजिस्टर नमुना नंबर १ चा उतारा तालुका स्तरावर तातडीने मागवण्यात आला आहे. यामध्ये विजयी उमेदवार यांचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, शाळेत दाखल झाल्याची तारीख इत्यादी तपशील यांचा समावेश यामध्ये आहे. विशेष म्हणजे ही माहिती संकलीत करण्याचे काम प्राथमिक शाळा पातळीवर सोपवण्यात आले असून विजयी ठरलेल्या महिलांचे लग्नानंतर नावात बदल झाल्याने तसेच ज्या शाळेमध्ये गावाचा पूर्व इतिहास माहिती नसणारे शिक्षक आहेत. अशा ठिकाणी माहिती संकलन करण्यात कठीण जात असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या संपर्क साधला असता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची तपशीलवार माहिती तातडीने राज्य सरकारला द्यावयाची असल्याने याबाबत माहिती संकलन करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –

अक्षय्य तृतियेला राज्यभर महाआरती करा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -