घरक्रीडाIPL 2020 MI vs CSK : स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याची मुंबईला शेवटची...

IPL 2020 MI vs CSK : स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याची मुंबईला शेवटची संधी, उद्या चेन्नईशी भिडणार

Subscribe

सलग सहा पराभवानंतर स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर असलेला मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. या सामन्यात विजयाचे खाते उघडून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल. चेन्नईविरुद्ध गुरुवारी हरल्यास मुंबई स्पर्धेतून बाहेर होणार आहे. गतविजेत्या चेन्नईची स्थितीही चांगली नाही. दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये तळाला आहेत. चेन्नईने सहा पैकी पाच सामने गमावले आहेत.

मुंबईसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म, त्याने सहा सामन्यांत केवळ ११४ धावा केल्या आहेत. मुंबईला प्रथम खेळताना लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या करायची असेल, तर रोहितला मोठी खेळी खेळावी लागेल. युवा फलंदाज इशान किशनलाही चांगली कामगिरी करता आलेल नाही. त्याने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने १९१ धावा केल्या आहेत. तर डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत पण मधल्या फळीतील जबाबदारी त्यांना स्वाकारावी लागेल. अष्टपैलू कायरन पोलार्डनेही आतापर्यंत निराश केले आहे. तो आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला असून त्याने केवळ ८२ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईसाठी फलंदाजीपेक्षा गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह वगळता इतर गोलंदाजांनी आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, बेसिल थम्पी किंवा मुख्य फिरकीपटू मुरुगन अश्विन यांना आता सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

तर प्रतिस्पर्धी चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडचे फॉर्ममध्ये परतणे सकारात्मक संकेत आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या आक्रमक फलंदाजीचे उत्तम उदाहरण सादर केले पण गुजरातविरुद्ध ते अपयशी ठरले. दुबेला अंबाती रायडू आणि मोईन अलीसह मधल्या फळीत अधिक जबाबदारी खांद्यावर घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

कर्णधार रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी फिनिशरची भूमिका बजावू शकतात. जडेजा गोलंदाजीमध्ये अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. ड्वेन ब्राव्हो आणि फिरकीपटू महेश तिक्ष्णा वगळता चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली नाही. दीपक चहर बाद आणि अॅडम मिल्ने अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे चेन्नईची जबाबदारी या गोलंदाजांवर आहे.

उद्याचा सामना – दिल्ली वि. राजस्थान

वेळ – ७.३० सायंकाळी

ठिकाण – एमसीए स्टेडियम, पुणे

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -