घरमनोरंजनरायगडावर रंगला 'रायगडाला जेव्हा जाग येते'चा दिमाखदार प्रयोग

रायगडावर रंगला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’चा दिमाखदार प्रयोग

Subscribe

'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. रायगडावर झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाचा आनंद व्यक्त करताना पुढील वर्षभरात विविध भागांमध्ये या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस नाटकाच्या टीमने यावेळी व्यक्त केला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिनाचे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून रायगडावर मराठी रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर झालेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित केला होता. रायगडाच्या माथ्यावरून रायगड अनुभवणं हा एक आनंदी सोहळा होता. हा सोहळा अनुभवण्याची सुवर्ण संधी ‘वारसा’ दिनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ–नाटयशाखा रंगमंचाच्या सहयोगाने नाटयरसिकांना अनुभवायाला मिळाली.याचे निमित्त होते ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या विशेष नाटय प्रयोगाची.

आपल्या परंपरा आणि संस्कृतीवर इतिहासाचा वरदहस्त असतो. जो आपल्या नकळत आपण पुढच्या पिढ्यांसाठी नवा वारसा निर्माण करत असतो, मिळालेला हा वारसा जपणे आणि तो पुढील पिढीला हस्तांतरीत करणे खूप महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे मराठी रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर आहे. हा ठेवा जतन व्हायाला हवा या उउद्देशाने हा अनोखा प्रयोग आम्ही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आमदार श्री.भरत शेठ गोगावले, डॉ. नंदिनी भट्टाचार्य साहू , डॉ.राजेंद्र यादव हे मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. रायगडावर झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाचा आनंद व्यक्त करताना पुढील वर्षभरात विविध भागांमध्ये या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस नाटकाच्या टीमने यावेळी व्यक्त केला. तसेच या नाटकाचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले असून यामध्ये प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार आहेत.

 

- Advertisement -

 

सिंघम फेम काजल अग्रवाल झाली आई ; दिला गोंडस मुलाला जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -