घरठाणेठाण्यात बेवारस कारवाईतील भंगार गाड्यांना आग; दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

ठाण्यात बेवारस कारवाईतील भंगार गाड्यांना आग; दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

Subscribe

माजीवडा येथील मुंबई नाशिक हायवे जवळ, रुस्तमजी सेल्स ऑफिसच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेत भंगार गाड्यांना आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. या आगीवर अंदाजे दीड तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत जळून खाक झालेल्या गाड्या या रस्त्यांवर वर्षोनुवर्षे बेवारस अवस्थेतील पडून असलेल्या गाड्या होत्या.

ठाणे महापालिका, वाहतुक शाखा तसेच आरटीओ या विभागांनी केलेल्या कारवाईतील त्या गाड्या होत्या. मात्र नेमक्या किती गाड्या जळून खाक झाल्याया आहेत. ते अद्यापही स्पष्ट झाले नाही. माजीवडा येथील मोकळ्या जागेत भंगारातील गाड्या एकमेकांवर टाकण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवनांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र आग धुमसत होती. या आगीवर अंदाजे दीड तासांनंतर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. यावेळी, १-फायर वाहन व १-रेस्क्यू वाहन, १-वॉटर टँकर पाचारण करण्यात आले होते. या गाडी दुचाकी, रिक्षा आणि चार चाकी गाड्यांचा समावेश असून त्या गाड्या एकमेकांना टाकण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात उशीर होत होता. नेमक्या किती गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. हे समजू शकले नाही. तर आगीचे कारणही अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी सांगितले.
..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -