घरमहाराष्ट्रविधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान

Subscribe

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत.  बिहारमध्ये 7 जागांसाठी  तर उत्तर प्रदेशात 13 जागांसाठी निवडणूक होत आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया 2 जूनला सुरु होणार असून 9 जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

मुदत संपलेले सदस्य

- Advertisement -

१. सुभाष देसाई (शिवसेना)
२. प्रविण दरेकर (भाजपा)
३. रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)
४. सदाभाऊ खोत (भाजपा)
५. दिवाकर रावते (शिवसेना)
६. प्रसाद लाड (भाजपा)
७. सुजीतसिंह ठाकूर (भाजपा)
८. संजय दौंड (राष्ट्रवादी)
९. विनायक मेटे (भाजपा)
१०. रामनिवास सिंह (भाजपा, निधन झाल्याने जागा रिक्त)

या राज्यातही होणार निवडणूक

- Advertisement -

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. बिहारमध्ये 7 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी 20 जून रोजी पार पडणार आहे.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम 

नोटिफिकेशन – २ जून २०२२
उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२
अर्जांची छाननी – १० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२
मतदानाचा दिवस – २० जून २०२२
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४
मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -