घरमहाराष्ट्रMask Compulsory : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू

Mask Compulsory : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू

Subscribe

महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एका मास्क सक्ती (Mask Compulsory) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मास्क सक्तीसंदर्भात पत्र पाठवले आहे. (Maharahstra Corona Update)

महाराष्ट्रातील कोरोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ पाहता (Corona patients increasing) सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असल्याचं या पत्रात नमुद करण्यात आहे. यामध्ये रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. (Maharashtra state government)

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्रात आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या आणि लसीकरण वाढण्यासंदर्भात सुचना केल्या. जगभरात नव्या व्हायरसच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य सरकारने आता नव्याने निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सार्वजनिक आणि बंद जागांचा समावेश आहे.

दरम्यान वारंवार सूचना देऊनही राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांमध्ये मोठी घट दिसून आली. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेशे सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सुचना या पत्रातून दिल्या आहेत.

- Advertisement -

कुठे असणार मास्क सक्ती ?

रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, हॉटेल, बंदीस्त सभागृह, गर्दीची ठिकाणं, सार्वजनिक वाहतूक सुविधा, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे.

केंद्राच्या पत्रानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये

राज्यात कोरोना रुग्णसंख्या ही एक हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे काल केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचा इशारा दिला, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढतेय असे केंद्राने नमुद केले. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना चाचण्या वाढवण्याबरोबरचं लसीकरण वाढवण्याच्या सल्लाही राज्य सरकारला केल्या आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -