घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या कमांडोंच्या भत्त्यात वाढ, दरमहा मिळणार 'इतका' भत्ता 

नक्षलवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या कमांडोंच्या भत्त्यात वाढ, दरमहा मिळणार ‘इतका’ भत्ता 

Subscribe

राज्यातील नक्षलग्रस्त भागातील सी ६० पथकातील जवांनाना दिवस-रात्र सतत संकटाचा सामना करावा लागतो. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याबरोबर त्यांचा बिमोड करण्याचे  काम जवानांना  करावे  लागते.

नक्षलग्रस्त भागात ( Naxal-affected areas) नक्षलवाद्यांशी  लढणा-या ‘सी-६०’ या विशेष पथकातील (special squad C-60) कमांडोंच्या (commando) भत्त्यात (allowance) दुप्पट वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने (maharashtra Home Department)  घेतला आहे. त्यामुळे सध्या दरमहा मिळणारा कमांडो भत्ता आठ हजार रुपये होणार आहे. त्यामुळे नक्षलवादविरोधी चळवळीला मोठे बळ मिळणार आहे.

राज्यातील नक्षलग्रस्त भागातील सी ६० पथकातील (squad C-60) जवांनाना दिवस-रात्र सतत संकटाचा सामना करावा लागतो. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याबरोबर त्यांचा बिमोड करण्याचे  काम जवानांना  करावे  लागते. त्यामुळे सी ६० पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सध्या देण्यात येत असलेल्या कमांडो भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

नक्षलग्रस्त भागातील विशेष अभियान पथकातील कमांडोंना सध्या दरमहा चार हजार रुपये कमांडो भत्ता दिला जात होता. यामध्ये दुप्पट वाढ करून हा भत्ता दरमहा आठ हजार रुपये करण्यात आला  आहे. गडचिरोलीत विशेष अभियान पथकात काम करीत असेपर्यंतच आठ हजार रुपये भत्ता दिला जाईल. या भत्त्यात करण्यात आलेली वाढ इतर पथकांना लागू होणार नाही,  असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

नक्षली चळवळ अतिशय सक्रीय होती त्यावेळी  तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी १९९०मध्ये सी-६० पथकांची स्थापना केली.  सुरवातीला ६०  कमांडोंचे पथक होते. त्यावरून सी-६० हे नाव देण्यात आला. हे पथक यशस्वी झाल्यामुळे पुढे या पथकातील कमांडोंच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्याच्या घडीला  अत्याधुनिक शस्त्रसज्ज एक हजार  कमांडो या पथकात आहेत.  हे पथक नक्षल्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळऱले जाते.  नोव्हेंबर २०२१मध्ये गडचिरोलीतील जंगलात नक्षलवाद विरोधी पथकासोबत  झालेल्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -