घरदेश-विदेशLive Update : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्रुटी आढळल्यास दूर करू...

Live Update : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्रुटी आढळल्यास दूर करू – भुजबळ

Subscribe

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्रुटी आढळल्यास दूर करू – भुजबळ

ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू

- Advertisement -

विधान परीषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची उद्या बैठक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात ईडीविरोधात आंदोलन

- Advertisement -

खासदार राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस आक्रमक

काँग्रेसचा राजभवनावर मोर्चा धडकणार


दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार


खासदार नवनीत राणांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट

राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळणार – नवनीत राणा

मुंबईत शिवसेनेचे दिवस भरलेत – नवनीत राणा


पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढावा – खासदार इम्तियाज जलील

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष काढावा मी त्यांना पाठिंबा देईल – जलील


अधीश बंगल्यावरील कारवाईबाबत प्राधिकरणाकडे दाद मागा – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आदेश
२४ जूनपर्यंत कारवाई करु नका – मुंबई उच्च न्यायालय


भाजपची नेत्यांची बैठक सुरु, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित

भाजप कार्यालयात बैठकीला सुरुवात

देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक


नवाब मलिक- अनिल देशमुखांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरु
विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक-अनिल देशमुख यांनी केली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या स्वास्थ्यासाठी पुण्यात मनसैनिकांकडून आरती

पुण्यातील गणपतीच्या मंदिरात केली आरती


सैन्याच्या अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध वाढला, बिहारमध्ये जाळपोळ

बिहारमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरुन अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. अग्रिपथ योजनेमध्ये चार वर्षांची सेवा देण्यात येणार आहे. परंतु या ४ वर्षांच्या कालावधिला तरुणांनी विरोध केला आहे. बिहारमध्ये तरुण रस्त्यावर उतरले असून जाळपोळ आणि दगडफेक केली आहे.

 


आमदार रोहित पवारांकडून उद्योगपती गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य

 

अदानी बारामती दौऱ्यावर


देशात १२ हजार २१३ कोरोनाबाधितांची नोंद, तर ११ जणांचा मृत्यू

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णांच्या संख्येत वाढ


मानखुर्द गोवंडीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेलकडून सीएसटीएमला जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा

पनवेल ते सीएसटीएम आणि सीएसटीएम ते पनवेल लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत


अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी


मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग भागात मुसळधार पावसाला सुरुवात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -