घरताज्या घडामोडीपहिल्याच पावसात चेंबूरमध्ये दरड कोसळली, दोनजण गंभीर जखमी

पहिल्याच पावसात चेंबूरमध्ये दरड कोसळली, दोनजण गंभीर जखमी

Subscribe

दरड कोसळून (Land slide) दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबईच्या चेंबुर (Chembur) परिसरात घडली आहे. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दरड कोसळून (Land slide) दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबईच्या चेंबूर (Chembur) परिसरात घडली आहे. रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती अशी जखमी झालेल्या स्थानिकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही भाऊ आहेत. या जखमींना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Land slide in chembur two people injured)

कोणतीही जीवितहानी नाही

- Advertisement -

चेंबूरच्या न्यू भारतनगरमध्ये (New Bharat Nagar Chembur) सकाळी ही दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दरड कोसळण्याने संबंधित परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्याला सुरूवात केली.

सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरीत

- Advertisement -

चेंबूर (Chembur) येथील ही झोपडपट्टी डोंगरी भागात असल्याने या ठिकाणी दरड कोसळली. दरम्यान, याआधीही या विभागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईच्या (Mumbai) अनेक भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. तसेच काही जण गंभीर जखमी होतात. त्यामुळे प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना स्थलांतरीत होण्याचा सल्ला दिला जातो.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Rainfall) हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच १८ जूननंतर मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, मुसळधार पावसाला रविवारी सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. मुंबईच्या अनेक भागांच पाऊस पडत असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईत दरड कोसळून दोन जण जखमी झाले. त्यामुळे येत्या काळात अशा घटना घडल्यास प्रशासन त्यावर काय उपाययोजना करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 1 वारकरी ठार, 30 जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -