घरलाईफस्टाईलपार्टनर दुर्लक्ष करतोय? हे आहेत ब्रेक अपचे संकेत आणि उपाय

पार्टनर दुर्लक्ष करतोय? हे आहेत ब्रेक अपचे संकेत आणि उपाय

Subscribe

पार्टनर अचानक शांत झाला. तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागला,तुमच्याशी बोलण्यास टाळाटाळा करु लागला, चिडचिड करु लागला तर समजून जा कि त्याचा तुमच्यातला रस कमी झाला आहे

जर तुम्ही रिलेशिनशिपमध्ये (relationship) आहात पार्टनरबरोबर तुमचे मधुर संबंध आहेत. नातेसंबंधात आवश्यक असलेल्या एकमेकांची काळजी, प्रेम, आदर , आनंद, रुसवे फुगवे या सर्व गोष्टी तुमच्यात आणि पार्टनरमध्ये ओतप्रोत आहेत तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. कारण याचा अर्थ तुमचे नाते खरोखरचं सुदृढ आहे. पण जर नेहमी तुमची काळजी घेणारा विचारपूस करणारा पार्टनर अचानक शांत झाला. तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागला,तुमच्याशी बोलण्यास टाळाटाळा करु लागला, चिडचिड करु लागला तर समजून जा कि त्याचा तुमच्यातला रस कमी झाला असून तो ब्रेक अपच्या मार्गावर आहे.

कुठल्याही नात्यासाठी ब्रेक अप ही दुखद गोष्ट आहे. पण कोणीही उगाच आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून जाण्याचा विचार करत नाही. तर त्यामागे अनेक कारणेही असतात. कारण कुठलेच नाते सहजासहजी तुटत नाही. नाते तुटण्यामागे त्यांच्यात दुरावा येण्यामागे प्रमुख कारणे असते विश्वास.

- Advertisement -

जर तुमच्यात काही गोष्टींवरून सतत वाद होत असतील तर चर्चेतून त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.

जर तुमच्यात काही गोष्टींवरून गैरसमज झाला असेल तर तो दूर करा.

- Advertisement -

पार्टनरला सगळे खरं सांगून आपली बाजू मांडा.

त्यामुळे तुमच्यात भविष्यातही गैरसमज होऊ शकणार नाही

पार्टनरला जास्तीत जास्त वेळ द्या

त्याचे तुमच्यावरील उडालेल्या विश्वासामागचे कारण समजून घ्या

पार्टनरबरोबर फिरायला जा

त्याला आवडेल ते करण्याचा प्रयत्न करा.

तुमचे वागणे कसे चुकले किंवा त्यामागचे कारण त्याला मोकळेपणाने सांगा

जर त्याचे तुमच्यावर प्रेम असेल तर तो तुम्हांला नक्कीच समजून घेईल

पण त्याच चुका वारंवार करू नका

अन्यथा तुमच हसत खेळत नातं संपुष्टात येईल

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -