घरमनोरंजनसेलिब्रिटींचा विठ्ठल पडद्यावर

सेलिब्रिटींचा विठ्ठल पडद्यावर

Subscribe

तुम्हा आम्हाला अभिमान वाटावा असे मराठीतील दोन स्टार हिंदीत छान रुळलेले आहेत. नायक म्हणून त्यांनी आपले स्थान प्रस्थापित केले आहेच; पण विनोदी भूमिका, सूत्रसंचालक म्हणूनही बॉलिवूडमधे मानाचे स्थान निर्माण केले आहे. या दोन्ही कलाकारांचा संचार बॉलिवूडमधे वरच्या स्थानावर सुरू असला तरी अधूनमधून मराठी चित्रपटांना वेळ देणे, इतकेच काय तर चित्रपट निर्मितीसाठीसुद्धा तयारी दाखवलेली आहे. एक आहे ‘लय भारी’ रितेश देशमुख तर दुसरा ‘पोस्टरबॉय’ श्रेयस तळपदे. या दोघांचेही मराठी चित्रपटात बर्‍याच दिवसांनी येणे होत आहे. एक ‘माऊली’ च्या निमित्ताने, ज्यात रितेश मुख्य भूमिकेत असणार आहे, तर दुसरा ‘विठ्ठल’च्या निमित्ताने ज्यात श्रेयस दिसणार आहे.

दोघांचेही विषय हा विठ्ठलाचा महिमा सांगणारा आहे. थोडक्यात काय तर चित्रपटात दिसणारा विठ्ठल हा सेलिब्रिटी कलाकारांचा असणार आहे. कार्तिकी एकादशीचे निमित्त घेऊन हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांनी जोरदार तयारी केली होती. रितेशच्या माऊलीने १४ डिसेंबरला तर श्रेयसच्या विठ्ठलाने ७ डिसेंबरला प्रदर्शित होण्याची तयारी दाखवलेली आहे. नाणं खणखणीत असेल तर ते चालते हे यापूर्वीच्या चित्रपटांनी पटवून दिलेले आहे. माऊलीच्या निमित्ताने अजय अतुल यांचे संगीत प्रेक्षकांना परत ताल धरायला लावणार आहे. श्रेयसच्या विठ्ठलच्या बाबतीतही असेच काहीसे होणार आहे. २५ फुटाच्या भव्यदिव्य विठ्ठल मूर्तीच्या समोर २०० ते ३०० कलाकार एका सुरात, एका तालात नाच करताना दिसणार आहेत. गुरु ठाकूर याचे गीत आणि राजू सरदार यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. संचित पाटील हा विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -