घरमुंबईनर्सेसना मिळणार मानसिक आरोग्याविषयीचे धडे

नर्सेसना मिळणार मानसिक आरोग्याविषयीचे धडे

Subscribe

भारतासह मुंबईसारख्या मोठ्या आणि धावपळीच्या शहरात मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, आता मानसिक आजार आणि वाढलेल्या तणावातून बाहेर येण्यासाठी रूग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. पण, हे प्रमाण आजही कमी आहे.

मानसिक आरोग्याविषयी आजही समाजात हवी तशी जनजागृती झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय रुग्णालय आणि कॉलेजमधील नर्सेस आणि डॉक्टरांना मानसिक आरोग्याविषयीचे धडे देण्यात येणार आहेत. ज्यावेळी एखादा मानसिक रुग्ण रुग्णालयात दाखल होतो तेव्हा त्याचा संबंध सर्वात आधी परिचारिका म्हणजे नर्सेसोबत येतो. त्यामुळे नर्सला त्या रुग्णाला कसं हाताळायचं? त्याच्यावर कशापद्धतीने मानसिक उपचार करावेत? हे माहित असणं गरजेचं असतं.

मुंबईत मानसिक रुग्नांच्या संख्येत वाढत 

भारतासह मुंबईसारख्या मोठ्या आणि धावपळीच्या शहरात मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, आता मानसिक आजार आणि वाढलेल्या तणावातून बाहेर येण्यासाठी रूग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. पण, हे प्रमाण आजही कमी आहे. ‘इंडियन सायकॅट्रीक सोसायटी’ आणि केईएम यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ डिसेंबरला वरळीच्या नेहरु सायन्स सेंटरमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी ‘Suicide prevention : understanding the patient at risk’ या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन सायकॅट्रीक सोसायटीच्या मानसोपचार तज्ज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक कॉलेजमध्ये नर्सिंग स्टाफकडे पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचा रुग्ण जातो. त्यामुळे रुग्णांशी कसं बोलायचं? त्यांना कसं हाताळायचं? याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय, मानसिक आजाराचे जे रुग्ण असतात ते आधीच खूप तणावाखाली असतात. त्यामुळे, त्यांना नीट समजावून सांगावं लागतं. हल्ली आत्महत्या करण्याचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. त्यामुळे ज्याचा रुग्णांशी प्रथम संबंध येतो अशा सर्वांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आज पालकांनाही कळत नाही कि त्यांचा मुलगा किंवा मुलगी कधी जाऊन आत्महत्या करतात ते. त्यामुळे विशेषत: पालकांना आणि शिक्षकांना याबाबतचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. असे एकूण २० कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

– डॉ. शुभांगी पारकर,  केईएम रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्रमुख

- Advertisement -

 

मानसिक आजाराबद्दलच्या जागृतीसाठी ‘Indian psychiatric society’ आणि केईएम रुग्णालयातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात परिचारिकांना मनोरुग्णांवर कसे उपचार द्यावे ? याचं प्रशिक्षण दिलं जाईल. यात मनोरुग्णांशी कसं बोलावं, त्यांची बाजू कशी समजून घ्यावी, उपचार कसे करावेत, रुग्णांच्या समस्या जाणून त्या कशा सोडवाव्यात? याबद्दल परिचारिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासोबतच शिक्षक आणि पालकांनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

– डॉ. गौतम शहा, इंडियन सायकॅट्रीक सोसायटीचे जनरल सेक्रेटरी

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -