घरभक्तीरक्षाबंधन 2022 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या शुभमुहूर्त

रक्षाबंधन 2022 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या शुभमुहूर्त

Subscribe

रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतात. रक्षाबंधनाची वेळ ११ ऑगस्ट रोजी गुरूवारी सकाळी १०.३८पासून सुरू ते १२ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी ७.०५ पर्यंत असेल

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे, कारण या दिवशी रवि योग सुद्धा असणार आहे.

रक्षाबंधन तिथी
प्रत्येक वर्षी रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतात. रक्षाबंधनाची वेळ ११ ऑगस्ट रोजी गुरूवारी सकाळी १०.३८ पासून सुरू ते १२ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी ७.०५ पर्यंत असेल.

- Advertisement -

रक्षाबंधन शुभ मुहूर्त
रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणे लाभकारी मानले जाते.

  • अभिजीत मुहूर्त- त्यामुळे यावेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ९ वाजून २८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत असेल.
  • रवि योग- या दिवशी सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत रवि योग असेल.
  • अमृत योग- संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांवर बांधलेली राखी अत्यंत शुभ मानले जाते

रक्षाबंधन योग्य पद्धतीने करा साजरा

  • रक्षाबंधन योग्य पद्धतीने करा साजरा करण्यासाठी या दिवशी बहिण आणि भावाने स्वच्छ आणि सुंदर वस्त्र परिधान करुन देवी-देवतांची पूजा करावी.
  • शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन साजरी करावी, यावेळी एक छान ताट सजवावे, त्यात कुंकू, अक्षता, मिठाई, निरांजन, राखी या सगळ्या वस्तू ठेवाव्या.
  • भावाला बसण्यासाठी पाट मांडावा, बाजूने सुंदर रांगोळी काढावी. भावाचे तोंड पूर्वे कडे होईल असा पाट मांडावा.
  • त्यानंतर भावाने टिळा, अक्षता लावून राखी बांधावी. निरंजनाने ओवाळून मिठाई खावू घालावी. तसेच देवाकडे त्याच्या दिर्घ आयुष्याची कामना करावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -