घरमुंबईकर्करोगातून बाहेर आलेल्या रश्मी मेहरा देणार शहिदांना श्रद्धांजली

कर्करोगातून बाहेर आलेल्या रश्मी मेहरा देणार शहिदांना श्रद्धांजली

Subscribe

गर्भाशयाचा कर्करोगावर मात करुन जीवनाची खरी किंमत समजते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी रश्मी मेहरा शहिदांना श्रद्धांजली देणार आहेत.

मृत्यूच्या तोडांतून बाहेर आल्यावर जीवनाची खरी किंमत समजते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्या शहिदांसाठी कर्करोगातून बाहेर आलेल्या रश्मी मेहरा २५ नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली देणार आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे. कर्करोगामुळे मरणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कर्करोगावर उपचार मिळून प्राण बचावलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. अशामध्ये रश्मी मेहरा यांनी फक्त आजावर मातच केली नाही तर स्वःताला एका सामान्य माणसाहूनही फीट ठेवले. २५ नोव्हेंबर रोजी रश्मी मेहरा या २१ किलोमीटर धावून शहिदांना श्रद्धांजली देणार आहेत. यावेळी रश्मी यांचा मुलगा आर्यन कुमारही ५ किलोमीटर धावणार आहे.

कोण आहेत रश्मी मेहरा?

रश्मी यांनी इंजिनियरींगमध्ये पदवी संपादन केली असून अर्थ शास्त्रात एमबीए केले आहे. त्यांनी सुमारे १५ वर्षे वित्तीय आस्थपनामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यावर त्यांनी स्वतःला सावरले. या दुखण्यामुळे त्यांना जीवनाचा अर्थ समजला. कर्करोगावर उपचार मिळवून त्यांनी स्वःताला फीट ठेवण्याचा प्रयत्न केला. रश्मी यांनी मानसिक स्वास्थ आणि समुपोदेशन यश विषयात प्रमाण पत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असून, त्या आता प्रमाणित समुपदेशक आहेत. रश्मी सध्या नवीन विचार करण्याची क्षमता कशी वाढवायची याचे लोकांना मार्गदर्शन करतात. जीवनातील सकारात्मक बदलांवर त्यांचा विश्वास आहे. त्या सध्या इंडियन कॅन्सर सोसायटी आणि काही रुग्णालयात जनजागृतीचे काम करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -