घरमुंबई२६/११ च्या पार्श्वभूमीवर 'द ट्रीब्युट रनचे' आयोजन

२६/११ च्या पार्श्वभूमीवर ‘द ट्रीब्युट रनचे’ आयोजन

Subscribe

या उपक्रमामध्ये नागरिकांबरोबर पोलिस अधिकारीही सहभागी होतील. २६/११ च्या घटनेला दहा वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या लाईफ इन्शुरन्स कंपनीने द सी हॉक्स फाऊंडेशन सोबत द ट्रीब्युट रनचे आयोजन केले आहे. २६/११ मुंबई हल्ल्याच्या घटनेला दहा वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यात शहीद झालेले व मुंबईच्या धाडसी वृत्तीला ट्रीब्युट रनच्या माध्यमातून सलाम करण्यात येणार आहे.रविवारी २५ नोव्हेंबर २०१८ ला नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथून द ट्रीब्युट रनला सुरवात होईल. मुंबईमध्ये या उपक्रमाची घोषणा करण्यात आली त्यावेळी आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे, चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रमण, स्पर्धा आयोजक मयांक व्यास सिंग आणि नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) चे अध्यक्ष जयंतीलाल शाह यांची उपस्थिती होती. यासोबतच सरलाबेन पारेख ज्यांनी या हल्ल्यात मुलगा व सून यांना गमावले.अतिरिक्त पोलीस आयुक्त ( दक्षिण विभाग) प्रवीण पडवळ, मुंबई पोलीस, माजी पोलीस आयुक्त व पब्लिक कन्सर्सन फॉर गर्व्हनन्स ट्रोस्ट या सेवाभावी संस्थेचे फाऊंडर जुलिओ रिबेरो आणि आंतरराष्ट्रीय फिटनेस अ‍ॅथलिट व फिटनेस ट्रेनर निशरिन पारीख यांची उपस्थिती होती.

पोलिसांसाठी मोफत स्पर्धेचे आयोजन

द ट्रिब्युट रनमध्ये तीन वेगवेगळ्या गटांचा समावेश करण्यात येणार आहे, ज्यामध्ये सशस्त्र दल, अर्धसैनिक बल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलिस, मुंबई अग्निशमन दल व मुंबई ट्रॅफिक पोलिस यांच्यासाठी स्पर्धेची नोंदणी मोफत असेल. तर, डिसेबल अ‍ॅथलीटना विशेष सवलत देण्यात येणार आहे. यासोबत इच्छुक धावपटू http://www.thetributerun.in/. या संकेतस्थळावर देखील आपली नावे नोंदवू शकतात.

- Advertisement -

“२६/११ घटनेला दहा वर्ष पूर्ण होत असून या पार्श्‍वभुमीवर मुंबईतील सर्वांना आम्ही द ट्रिब्युट रनच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत आहोत. या स्पोर्टिंग ट्रिब्युटच्या माध्यमातून आम्ही या घटनेतील शहीदांचे स्मरण करणार आहोत. आपण #KeepMoving,च्या माध्यमातून आणखीन भक्कम होण्याचा निर्धार करणार आहोत.”- आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे चिफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रमण 

 “द सी हॉक्स फाऊंडेशन व आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्या संयुक्तपणे ट्रिब्युट रनचे आयोजन केले आहे. २६/११ घटनेला  १० वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर पहिल्यांदाच अशा रनचे आयोजन होत आहे. आमचे वेन्यु पार्टनर असलेल्या नॅशनल स्पोर्ट्स क्‍लब ऑफ इंडिया (एनएससीआय) यांचे आम्ही आभारी आहोत. या घटनेत शहीद झालेल्यांसोबत आपल्या सुरक्षा दल, पोलिस फोर्स व मुंबईकरांच्या धैर्याला सलाम करण्यात येणार आहे. या विशेष रनसाठी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आम्ही करतो.- स्पर्धा आयोजक मयांक व्यास सिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -