घरमुंबईवडाळा ते सीएसटी मेट्रो धावणार

वडाळा ते सीएसटी मेट्रो धावणार

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रोच्या तीन मार्गांना मंंजूरी देण्यात आली आहे. एमएमआरडीएने मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना केल्याचे आजच्या बैठकीत जाहीर केले. हे महामंडळ मेट्रो आणि मोनोरेलचे संचालन आणि व्यवस्थापनाचे काम पाहणार आहे.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गिका १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्गिका ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गिका १२ या तीन मार्गिकांचे सविस्तर अहवाल आजच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुर करण्यात आले. एमएमआरडीएने मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना केल्याचे आजच्या बैठकीत जाहीर केले. हे महामंडळ मेट्रो आणि मोनोरेलचे संचालन आणि व्यवस्थापनाचे काम पाहणार आहे. या महामंडळाअंतर्गत १ हजार पदे निर्माण करण्याचा निर्णय आज एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासोबतच जागतिक व्यापार सेवा केंद्र आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे-कुर्ला स्थानकाशी जोडण्याचा निर्णय आज प्राधिकरणाने घेतला. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नव्या बोधचिन्हाचेही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

हेही वाचा – मेट्रो कामामुळे पुण्यात नगर रस्त्यावरील बीआरटी बंद!

- Advertisement -

प्राधिकरणाचा आणखी विस्तार

प्राधिकरणाने मुंबई महानगर क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात वाढ करत आता पालघर तालुका, वसई तालुका आणि रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरीत भाग समाविष्ठ कऱण्यात आला आहे. या सर्व क्षेत्राची विकासाची क्षमता प्रचंड असून त्याचा सुनियोजित आणि दीर्घकालीन स्वरूपाचा विकास होण्यासाठी मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. या क्षेत्रातील विकास केंद्रावर आमचा भर असेल असेही त्यांनी सांगितले.

१००० पदांची निर्मिती

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गिका १० प्रकल्पासाठी ४४७६ कोटी रूपये, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्गिका ११ प्रकल्पासाठी ८७३९ कोटी रूपये आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गिका १२ प्रकल्पासाठी ८७३९ कोटी रूपये असे या प्रकल्पांचे अहवाल आजच्या बैठकीत मंजुर करण्यात आले. हे अहवाल पुढील कारवाईसाठी राज्य सरकारसमोर सादर करण्यात येतील.

- Advertisement -

हेही वाचा – दारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये पसरवली बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये गोंधळ

बुलेट ट्रेनसाठी आणखी जागा

जागतिक व्यापार सेवा केंद्र आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे कुर्ला स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी ४.५ हेक्टर आणि ०.९ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. हे दोन्ही प्रकल्प एकत्र आल्यामुळे रोजगाार निर्माण होतील. तसेच प्राधिकरणाला ४ इतक्या चटई क्षेत्राचा निर्देशांक वापरता येईल. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांचे निकषांनुसार पुर्नवसन करण्यात येईल.

कलिनासाठी विशेष प्राधिकरण

मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पस भागाशी निगडीत असणाऱ्या दोन रस्त्य्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणूनही प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बीकेसी आणि हंस भुगा मार्ग जोडणारा २ किमीचा उन्नत मार्ग आणि वांद्रे कुर्ला संकुलात बांधला जाणारा ६९० मीटर लांबीच्या रस्त्यासाठी विद्यापीठाची काही जागा प्राधिकरणाकडून वापरण्यात येणार आहे.

वॉर रूम आणि इनोव्हेशन सेंटर

मंत्रालयातील वॉर रूमच्या धर्तीवरच प्राधिकरणानेही वॉर रूम एण्ड इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर तातडीचे निर्ण घेणे तसेच हे निर्णय मार्गी लावणे गरजेचे आहे. मूलभूत स्वरूपाचे संशोधन कार्य हाती घेऊन मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ही वॉर रूम उपयुक्त ठरणार आहे.


हेही वाचा – मेट्रो ३ प्रकल्पात सेन्सरचे तंत्रज्ञान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -